AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?

अक्षय तृतीयेचा दिवस हा एक शुभ काळ मानला जातो. याचा अर्थ असा की या दिवशी लग्नासाठी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नाही. चला तर मग यावर्षी अक्षय तृतीया केव्हा साजरी केली जाईल. या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि हा सण का साजरा केला जातो, हे देखील जाणून घेऊयात.

'या' तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
अक्षय्य तृतीया 2026
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 3:19 PM
Share

हिंदू धर्मात वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी याच दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. ही तारीख आणि सण धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की अक्षय तृतीयेला केलेले कोणतेही चांगले आणि शुभ कार्य अक्षय पुण्य म्हणजेच अखंड पुण्य प्रदान करते.

या शुभ दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने, भांडी इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. शिवाय अक्षय तृतीया हा एक शुभ काळ मानला जातो. याचा अर्थ असा आहे की या दिवशी लग्नासाठी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नसते कोणत्याही वेळी लग्नाचा सोहळा पार पाडता येतो. चला तर मग आजच्या लेखात आपण यावर्षी अक्षय तृतीया केव्हा साजरी केली जाईल. या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता असेल? तसेच हा सण का साजरा केला जातो, हेही जाणून घेऊयात.

अक्षय्य तृतीया 2026 कधी आहे?

पंचांगानुसार यावर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी 20 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजून 49 मिनिटांनी संपेल. अशातच मध्यान्हव्यापिनी तृतीया तिथी 19 एप्रिल रोजी दुपारी येईल. त्यामुळे यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजी साजरी केली जाईल.

अक्षय्य तृतीया पूजा शुभ मुहूर्त

या दिवशी पूजेची वेळ सकाळी 10 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल. हा शुभकाळ दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत चालेल. या वेळेत लक्ष्मी मातेची पूजा कोणत्याही वेळी करता येईल.

सोने खरेदी करण्याची वेळ

या दिवशी सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल.हा दिवस 20 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजून 51 मिनिटांपर्यंत चालेल.

अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते?

धार्मिक मान्यतेनुसार वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी, विश्वाचे रक्षक भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात आपला सहावा अवतार घेतला. याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली. अक्षय तृतीयेलाच संपत्तीचा देव कुबेराने भगवान शिवाची तपश्चर्या केली आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना देवांचे कोषाध्यक्ष बनवले म्हणूनच या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा