AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : सारखी भांडणं होतायेत, मग ही झाडं तर तुमच्या घरात नाहीयेत ना? वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही चुका करतो, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास आयुष्यात अचानक पैशांची अडचण जाणवू लागते, घरात काहीही कारण नसताना भांडणं सुरू होतात, अशी लक्षणं दिसू लागतात.

Vastu Shastra : सारखी भांडणं होतायेत, मग ही झाडं तर तुमच्या घरात नाहीयेत ना? वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 8:56 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं माण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार घराची रचना ही नेहमी वास्तुशास्त्राप्रमाणेच असली पाहिजे. त्यामुळे घराला सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होते. मात्र आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे देखील घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास विविध मार्गाने तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. जसं एखादं काम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, परंतु त्या कामासाठी अचानक विलंब होतो. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच काहीही कारण नसताना देखील घरात अचानक वादविवाद वाढू लागतात. हे देखील वास्तुदोषाचं आणखी एक लक्षण आहे. दरम्यान वास्तुशास्त्रानुसार काही मूर्ती आणि झाडं हे खूप शुभ असतात, ते जर तुम्ही तुमच्या घरात ठेवले तर तुमची भरभराट होते. परंतु अशा देखील काही मूर्ती आणि झाडं आहे, ते जर तुमच्या घरात असतील तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. अशाच काही झाडांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

काटे कोरांटीचं झाड – काटे कोरांटी हे एक सुंदर फुलं असणारं झाडं आहे. या झाडाला सुंदर अशी पिवळी फुलं येतात. त्यामुळे अनेकजण हे फुलांचं झाडं आपल्या घरात लावतात. परंतु हे झाड घरात लावू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अशा झाडांमुळे घरात गृहकलह वाढतो, घरात सतत भांडणं होतात. काटे कोरांटीच नाही तर काट्याचं कोणतंही झाडं घरत लावू नये. याल फक्त एकच झाड अपवाद आहे, ते म्हणजे गुलाब.

निवडूंग – निवडूंग हे साधारणपणे वाळवंटी भागात वाढणारी वनस्पती आहे, ही वनस्पती दिसायला खूप आकर्षक असते. या वनस्पतीला लाल आणि गोड फळे येतात. परंतु या वनस्पतीला प्रचंड काटे असतात. अशी वनस्पती घरात किंवा घराच्या परिसरात लावू नये, यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, हातात पैसा टिकत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. या झाडाला खोड नसते, तर पानच खोडाचं काम करतात.

बोरीचं झाडं – बोरं अनेकांना खायला आवडतात. परंतु घराच्या समोर घरात किंवा घराच्या बागेत बोरीचं झाडं असू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना