पायात काळा धागा बांधताय! माहितीये 9 गाठींचं काय आहेत नियम, शुभ मुहूर्तांबद्दल घ्या जाणून
अनेक मुलींना पायात काळा धागा बांधायला आवडतं. पण पायात काळा धागा बांधण्याचे देखील काही नियम आहेत. यामागे शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पायाला काळा धागा बांधण्यामागे भक्कम आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. तर जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त...

हिंदू धर्मात शास्त्र आणि ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व आहे. सांगायचं झालं तर, अनेक जण पायात काळा धागा बांधतात. आता पाहायचं झालं तर, काळा दाखल अनेक जण पायात बांधतात, आजची तरुण पिढी फॅशन म्हणूनही पायात काळा धागा बांधते. पण, शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पायाला काळा धागा बांधण्यामागे भक्कम आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत. असं देखील सांगितलं जातं की, आपल्या सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जा आणि दृष्टदोषापासून आपले संरक्षण करण्यासाठी काळा धागा बांधला जातो. काही लोकांना संध्याकाळी विनाकारण खूप थकवा जाणवणे, वारंवार आजारी पडणे किंवा कामात गती मंदावणे यांसारख्या समस्या येतात. अशा परिस्थितीत, शरीरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टदोषाचा प्रभाव टाळण्यासाठी पायाला काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो.
कालभैरव आणि नऊ ग्रहांमधील संबंध:
काशी परंपरेनुसार, या काळ्या धाग्याला ‘काशी दारा’ असंही म्हटलं जातं. धार्मिक श्रद्धेनुसार, काळा धागा हा संरक्षक देव कालभैरवाचे प्रतीक आहे. तसेच, ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की, शनी ग्रह व्यक्तीच्या जीवनात पायांमार्फत प्रवेश करतो. त्यामुळे, पायांना काळा धागा बांधल्याने कुंडलीतील शनी, राहू आणि केतू या ग्रहांचे दोष कमी होऊ शकतात आणि त्यांच्या अशुभ प्रभावापासून सुटका मिळू शकते.
काळा धागा पायात बांधण्याचे फायदे आहेत, म्हणून धागा पायात बांधताना काही नियम पाळणं फार महत्त्वाचं आहे. काळ्या धाग्याला नऊ गाठी असाव्यात, ज्या आपल्या शरीराच्या नऊ दरवाजांचे प्रतीक आहेत. पुरुष आणि मुलांनी काळा धागा त्यांच्या उजव्या पायावर बांधावा. स्त्रिया आणि मुलींनी तो त्यांच्या डाव्या पायावर बांधणे शुभ मानले जाते. शनिवारी संध्याकाळी काळा धागा बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. धागा बांधताना मनात चांगला हेतू आणि सकारात्मक विचार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
काळ्या धाग्याचा हार घालण्याचे महत्त्व
अनेक स्त्रिया आणि मुली पायात काळ्या धाग्यासह चांदीचे किंवा पायराइटचे पैंजण घालतात. धर्मग्रंथ आणि मान्यतेनुसार, अशी दृढ श्रद्धा आहे की काळ्या धाग्यासह असे पैंजण घातल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट दृष्टी दूर होते आणि घरात व जीवनात धन-संपत्ती आकर्षित होते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)