Hairfall Astro Tips: कुंडलीतील या’ ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे उद्भवते केसगळतीची समस्या

Hairfall Astro Tips: आजकाल केसगळतीची समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळते. केसगळती फक्त तुमच्या जीवनशैलीमुळेच नाही तर तुमच्या कुंडलीतील ग्रह अस्थिर झाल्यास तुम्हाला आरोग्या संबंधीत आणि केसांसंबंधीत अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर जाणून घेऊया कुंडलीतील ग्रह स्थिर करण्यासाठी नेमकं का उपाय केले पाहिजेल.

Hairfall Astro Tips: कुंडलीतील या ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे उद्भवते केसगळतीची समस्या
केसगळतीची समस्या
| Edited By: | Updated on: Jan 25, 2025 | 4:35 PM

आजच्या काळामध्ये केस गळतीची समस्या खूप सामान्य झाली आहे. केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे तुमची व्यस्त जीवनशैली आणि जंक फूडचे अतिसेवर करणे. केस डॅमेज होण्याचे मुख्य कारण प्रदूषण देखील मानले जाते. केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. परंतु त्याचा काही परिणाम होत नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहाणे देखील आवश्यक आहे. शास्त्रामध्ये केसगळणे किंवा केसां संबंधीत समस्या उद्भवण्यासाठी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची अस्थिर स्थिती देखील असू शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अस्थिर होतात त्यावेळी तुम्हाला केसगळतीच्याा समस्या आणि केसामध्ये कोंडा होणे अशा समस्या उद्भवतात. तुमच्या कुंडलीतील ग्रहांचा तुमच्या आयुष्यावरच नाही तर तुमच्या आरोग्यावर देखील होतो. मान्यतेनुसार, तुमच्या कुंडलीतील ग्रह अस्थिर झाल्यास किंवा त्यांचे गोचर झाल्यास तुम्हाला केसगळतीच्या समस्या उद्भवतात. चला तर जाणून घेऊया केसगळती सारख्या समस्येसाठी नेमकं कोणते ग्रह कारमीभूत ठरतात आणि त्यावर काय उपाय केले पाहिजेल.

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत बुध आणि राहूची स्थिती बदल्ल्यमुळे तुम्हाला केस गळण्याच्या समस्या सुरु होतात. जेव्हा तुमच्या कुंडलीत बुध आणि राहू अशुभ प्रभावाखाली असतात तेव्हा त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जर तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह दुर्बल राशीत असेल किंवा कुंडलीच्या सहाव्या किंवा आठव्या घरामध्ये स्थित असेल तर त्या व्यक्तीला केसां संबधीत समस्या उद्भवू शकतात. तुमच्या कुडलीतील बुध ग्रह कमकुवत असल्यास तुम्हाला टक्कल पडू शकते. याशिवाय जर राहू ग्रह धनु किंवा वृश्चिक राशीमध्ये स्थित असेल आणि सूर्याची दृष्टी असेल तर केस गळण्याची समस्या वाढू शकते. कुंडलीत शनि गोचर असेल किंवा सहाव्या आणि आठव्या घरात असेल तर केसांची स्थितीही बिघडू शकते. कुंडलीत सूर्य, राहू आणि केतू एकत्र असल्यास किंवा सूर्य सहाव्या किंवा आठव्या घरात असल्यास टक्कल पडण्याची समस्या उद्भवते.

केस गळणे थांबवण्यासाठी ज्योतिषीय उपाय :- केसगळती थांबवण्यासाठी सूर्यदेवाला रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. या उपायाने केसांच्या समस्या तर कमी होतातच शिवाय मानसिक शांतीही मिळते. त्यासोबतच अनामिकेत तांब्याची अंगठी धारण केल्याने बुध आणि सूर्य ग्रह मजबूत होतात, ज्यामुळे केसांच्या समस्यांपासून आराम मिळतो. केस गळण्याच्या समस्येवर रुबी रत्न घालणे हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. रुबी रत्न परिधान करण्यापूर्वी, निश्चितपणे अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घ्या. राहुचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी रोज “ॐ राम राहवे नमः” या मंत्राचा जप करा. हा उपाय तुमच्या कुंडलीतील राहूला बळ देण्यासाठी उपयुक्त आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)