नोव्हेंबरमध्ये गाडी घ्यायचीय? 5 दिवस शुभ… पुष्य, हस्त, चित्रा, रोहिणी नक्षत्राचा शुभ योग, ही आहे यादी

नोव्हेंबर 2026 मध्ये नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आहे का? दिवाळीच्या काळात खरेदीचा आनंद वाढवण्यासाठी शुभ मुहूर्त महत्त्वाचा ठरतो. पुष्य, हस्त, चित्रा, रोहिणी नक्षत्रांच्या शुभ योगांमुळे नोव्हेंबरमध्ये 5 महत्त्वाच्या तारखा वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभ आहेत. दीर्घकाळ लाभासाठी या तारखा पाहूनच वाहनाची डिलिव्हरी घ्या

नोव्हेंबरमध्ये गाडी घ्यायचीय? 5 दिवस शुभ... पुष्य, हस्त, चित्रा, रोहिणी नक्षत्राचा शुभ योग, ही आहे यादी
auspicious vehicle purchase dates
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 3:29 PM

दिवाळी म्हटलं की खरेदी आलीच. मग कपडे असेल, सोनं असेल, घर असेल किंवा गाडी असेल… काही ना काही खरेदी केली जाते. यावेळी मार्केटमध्ये मोठी उलाढाल होत असते. त्यामुळेच दिवाळी सारख्या मोठ्या सणाला अनेकजण ऑफर्सही ठेवतात. त्यामुळे खरेदीला आणखी उत्साह येत असतो. पण खरेदी करताना अनेकजण दिवाळीच्या काळात शुभ दिवस किंवा शुभ मुहूर्त पाहत असतात. खास तिथी आणि नक्षत्र पाहून खरेदी केल्यावर त्याचा दीर्घकाळ लाभ मिळतो असं मानलं जातं. या दिवाळीतही खरेदी करायची असेल तर नोव्हेंबरच्या पाच दिवशी चांगला मुहूर्त आहे.

तुम्हालाही नोव्हेंबरमध्ये नवीन कार, बाइक वा अन्य वाहने खरेदी करायची असतील तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. नोव्हेंबर 2026 मध्ये वाहन खरेदी करण्यासाठी पाच शुभ तारखा आहेत. या दिवशी पुष्य, हस्त, चित्रा आणि रोहिणी सारखे शुभ संयोग बनत आहेत. अशावेळी तुम्ही नवीन वाहनाच्या डिलिव्हरीची तयारी करत असाल तर आधी या तारखा पाहून घ्या. शुभ मुहूर्त जाणून घ्या.

Loading...

वाहन खरेदी करण्यासाठीचे शुभ मुहूर्त, नोव्हेंबर 2026

1. 1 नोव्हेंबर 2026, रविवार : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी वाहन खरेदी करण्यासाठी चांगला मुहूर्त आहे. या दिवशी पुष्य नक्षत्रचा संयोग राहणार आहे. खरेदीसाठी हा संयोग खूप महत्त्वाचा मानला जातो.

शुभ मुहूर्त : दुपारी 2:51 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 पर्यंत

नक्षत्र : पुष्य

2. 6 नोव्हेंबर 2026, शुक्रवार : नोव्हेंबरमध्ये वाहन खरेदी करायची असेल तर 6 नोव्हेंबर सर्वात शुभ आहे. या दिवशी सकाळपासूनच वाहन खरेदीचा चांगला मुहूर्त आहे.

शुभ मुहूर्त : सकाळी 10:30 वाजल्यापासून ते 7 नोव्हेंबरच्या पहाटे 6:37 वाजेपर्यंत.

नक्षत्र : हस्त आणि चित्रा

3. 25 नोव्हेंबर 2026, बुधवार : महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी वाहन खरेदी करण्याचा चांगला योग आहे. या दिवशी रोहणी नक्षत्र असणार आहे. ज्योतिषात हे अत्यंत शुभ नक्षत्र असल्याचं सांगितलं जातं.

शुभ मुहूर्त : पहाटे 6:52 वाजल्यापासून संध्याकाळी 4:50 पर्यंत.

नक्षत्र : रोहिणी

4. 26 नोव्हेंबर 2026, गुरुवार : तुम्हाला जर 26 नोव्हेंबर रोजी कार किंवा बाइक खरेदी करायची असेल तर हा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. या दिवशी दुपारपासून संध्याकाळपर्यंत शुभ मुहूर्त राहणार आहे.

शुभ मुहूर्त : दुपारी 1:15 वाजल्यापासून संध्याकाळी 5:47 वाजेपर्यंत.

नक्षत्र : मृगशिरा

5. 29 नोव्हेंबर 2026, रविवार : नोव्हेंबर महिन्यातील वाहन खरेदी करण्याचा शेवटचा शुभ मुहूर्त 29 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पुष्य नक्षत्राचा संयोग आहे. वाहन, इतर वस्तू किंवा अन्य किंमती वस्तू खरेदी करण्यासाठी हा मुहूर्त अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

शुभ मुहूर्त : पहाटे 6:55 वाजल्यापासून 10:59 वाजेपर्यंत

नक्षत्र : पुष्य

वाहन खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या

ज्योतिश शास्त्रानुसार, वाहन खरेदी करताना केवळ वेळ किंवा तारीखच नव्हे तर शुभ समय आणि पंचांगाच्या अन्य बाबींकडेही लक्ष दिलं पाहिजे.

शुभ दिन : सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी वाहन खरेदी करणं शुभ मानलं जातं.

या दिवसांपासून सावध : शनिवार आणि मंगळवारी नवीन वाहने खरेदी करणं टाळा

राहुकाळ : वाहन खरेदी किंवा डिलिव्हरी करताना राहु काळ आणि भद्रा सारख्या अशुभ वेळांपासून सावध राहा.

पंचक पाहा : वाहन खरीदी करताना पंचागात पंचक आणि इतर अशुभ योगांची स्थितीही पाहा.

(Disclaimer : या बातमीतील माहिती धार्मिक मान्यता आणि सामान्य माहितीवर आधारीत आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us