Ganesh Chaturthi 2025: घरात करताय गणरायाची स्थापना! घरी आणण्यापूर्वी करायची महत्त्वाची तयारी, जाणून घ्या मुहूर्त
Ganesh Chaturthi 2025: सोमवारी अनेकांच्या घरात गणरायाची स्थापना होणार आहे. पण कामांची घाई असल्यामुळे अनेक गोष्टी लक्षात राहत नाही, त्यामुळे जाणून घ्या बाप्पाला घरी आणण्यापूर्वी करायची महत्त्वाची तयारी....

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. उद्या म्हणजे सोमवारी गणरायाचं आगमन होणार आहे. पण त्याआधी घरात कोणत्या गोष्टींची तयारी झाली पाहिजे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की, गणपतीच्या आगमनाने घरात ज्ञान, शुभता, संपत्ती आणि सकारात्मकता येते. पण गणपतीला घरी आणण्यापूर्वी काही महत्त्वाची कामं पूर्ण करणं दोखील तितकंच आवश्यक आहे. तर जाणून घ्या गणपतीची स्थापना करण्यापूर्वी करावयाची तयारी, पूजेचा मुहूर्त आणि चंद्रदर्शनाच्या वेळांविषयी संपूर्ण माहिती…
पूजास्थळाची स्वच्छता आणि मखराची सजावट: गणेशाचं स्वागत करण्यापूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ करा. मूर्ती स्थापनेची जागा आणि पूजा खोलीत असलेल्या अनावश्यक वस्तू दुसऱ्या जागेवर ठेवा. घरात स्वच्छता असेल तर, अत्यंत पवित्र वाटतं. त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य द्या. पूजास्थळी एक स्वच्छ चैरंग ठेवा आणि त्यावर लाल किंवा पिवळे कापड पसरा. फुले, आंब्याची पाने, रांगोळी आणि दिव्यांनी मंडप सुंदरपणे सजवा.
पूजेचे साहित्य आणि नैवेद्य: दिवा, धूप, अक्षता, गरिके, कलश, नारळ आणि पंचामृताचे साहित्य अगोदरच तयार ठेवा. पूजेसाठी मोदक आणि गणरायाला आवडतात असे फळे तयार ठेवा. याशिवाय, नैसर्गिक मातीपासून बनवलेली पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती निवडणं उत्तम राहिल. अत्यंत भक्तीभावाने आणि काळजीपूर्वक मूर्ती घरी आणा.
पूजा मुहूर्त: गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर रोजी असून दुपारच्या पूजेसाठी सकाळी 11.2 ते दुपारी 1.21 पर्यंतचा शुभ मुहूर्त असेल. या वेळात गणरायाची स्थापना घरात करा.
चंद्रदर्शन बंदी: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहिल्यास मिथ्या दोष निर्माण होतो. त्यामुळे चंद्राकडे न पाहण्याची काळजी घ्या.
गणरायाचं विसर्जन कराताना देखील काही गोष्टींची काळजी घ्या. तुम्ही विसर्जन घरीच करणार की स्थानिक प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी करणार, हे आधीच ठरवा. जर मूर्ती पर्यावरणपूरक मातीची असेल, तर तिचे घरीच एका कुंडीत विसर्जन करून त्यातील माती रोपांसाठी वापरणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
