वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या या 5 गोष्टी गरीबी आणू शकतात; तुमच्याही बाथरूममध्ये आहेत का?

वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडचणी तसेच गरिबी येऊ शकते. त्यामुळे काही ठराविक गोष्टी बाथरूममध्ये ठेवणे टाळले पाहिजे. तसेच वास्तू टिप्स पाळून घरातील सुख-समृद्धी टिकवता येते आणि नकारात्मकता दूर करता येते. तर, त्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या बाथरूममध्ये ठेवणे टाळले पाहिजेत हे जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या या 5 गोष्टी गरीबी आणू शकतात; तुमच्याही बाथरूममध्ये आहेत का?
Bathroom Vastu Shastra, Avoid keeping these 5 things in the bathroom
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 16, 2025 | 8:46 PM

वास्तुशास्त्रात, बाथरूम हे केवळ आंघोळीचे ठिकाण मानले जात नाही, तर नकारात्मक ऊर्जा पसरण्यास कारणीभूतही ठरते. कारण वास्तूशास्त्रानुसार एक छोटीशी चूक देखील संपूर्ण घराची सकारात्मक ऊर्जा बिघडवू शकते. तसेच संपत्ती, आरोग्य आणि नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम करू शकते. वास्तुशास्त्रात असा विश्वास आहे की बाथरूममध्ये काही वस्तू ठेवणे पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. कारण त्या अत्यंत अशुभ मानल्या जातात आणि जीवनातील समस्या वाढवू शकतात. त्या कोणत्या वस्तू आहेत जाणून घेऊयात.

काटेरी वनस्पती

बाथरूममध्ये काटेरी वनस्पती म्हणजे कॅक्टस, हिबिस्कस किंवा कोणतेही काटेरी झाड ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. अशा झाडांमुळे तणाव, कौटुंबिक संघर्ष आणि मुलांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून, बाथरूममध्ये किंवा घराच्या आत कोणतेही काटेरी रोप ठेवणे टाळावे.

तुटलेला आरसा

बाथरूममध्ये तुटलेला आरसा, अस्पष्ट किंवा चिरा पडलेला आरसा बाथरुममध्ये लावू नये. त्याचा घराच्या समृद्धीवर आणि नातेसंबंधांच्या स्थिरतेवर नकारात्मक परिणाम करतो. तुटलेला आरसा नकारात्मकता ऊर्जा वाढवतो. म्हणून, बाथरूमचे आरसे नेहमीच स्वच्छ, चमकदार असावे आणि तुटलेला अलावा.

जुने किंवा अस्पष्ट फोटो

काही लोक जुने किंवा पुसट झालेले फोटो, विशेषतः काही प्राण्यांचे किंवा असे काही फोटो बाथरूममध्ये लावले जातात जे अशुभ मानले जातात. असे काही फोटो वास्तुनुसार खूप अशुभ मानले जाते. यामुळे घरात कर्ज, आजारपण आणि मानसिक ताणतणावाची ऊर्जा सक्रिय होते. अशा वस्तू कधीही बाथरूमसारख्या ठिकाणी ठेवू नयेत.

तुटलेल्या पूजा वस्तू

याव्यतिरिक्त, बरेच लोक जुन्या माळा, तुटलेल्या अगरबत्ती किंवा तुटलेल्या मूर्ती यासारख्या तुटलेल्या पूजा वस्तू बाथरूममध्ये ठेवतात. हे देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते आणि त्यामुळे घरात सतत आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

गडद रंगाची बादली

शेवटी, बाथरूममध्ये काळे किंवा अगदी गडद निळे बादले, मग किंवा टॉवेल ठेवणे देखील अशुभ मानले जाते. वास्तुनुसार, हे रंग राहू, केतू आणि शनीच्या जड शक्तींना सक्रिय करतात, ज्यामुळे मन जड होते, चिडचिडेपणा वाढतो आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात.

 

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)