Chanakya Niti : वेळ कितीही वाईट असू द्या, या एका गोष्टीची साथ कधीच सोडू नका, यश हमखास मिळणारच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अनेकदा वाईट प्रसंग येतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी या मानसाने नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत, तरच त्याला यश मिळू शकतं.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान मांडलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाचं जीवन हे अनेक चढ उताराने भरलेलं असतं, आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येतात. उन्हा मागून सावली, सावली मागून ऊन हा खेळ आयुष्यात सतत सुरू असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात सापडतात, तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या जवळच्या लोकांची ओळख पटते. जे लोक फक्त तुमची मदत करण्याचं नाटक करत असतात, असे लोक जेव्हा तुम्ही संकटात सापडता तेव्हा ते तुमच्यापासून दूर निघून जातात. जेव्हा तुम्हाला खरी मदतीची गरज असते, तेव्हा असे लोक कधीही तुमची मदत करत नाहीत. या उलट जे खरंच तुमचे हितचिंतक आहेत, ते मात्र तुमच्या मदतीला धावून येतात.
मात्र जेव्हा तुम्ही संकटात सापडता तेव्हा तुम्ही कोणाकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका, जे लोक तुमच्या मदतीचं नाटक करत होते, ते लोक तुम्हाला संकट काळात तर कधीच मदत करणार नाही. तसेच तुमचे जे खरे हितचिंतक आहेत, त्यांना देखील काही मर्यादा असू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या संकट काळात कोणाकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. तर आयुष्यात फक्त एक गोष्ट कधीच सोडू नका, जर तुम्ही एवढं जरी केलं तर आयुष्यात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
ध्येय – चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही झालं तरी तुम्ही तुमच्या ध्येयापासून कधीही दूर जाऊ नका, कारण हे ध्येयच अशी गोष्ट आहे, जे तुमच्या यशाचं मुळ आहे. मुळं कधीही मजबूत असावीत, मुळं मजबूत असतात म्हणूनच त्यावर महाकाय वृक्षाचा डोलारा उभा राहतो. त्यामुळे तुमच्यावर परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही तुमच्या आयुष्यात ध्येयापासून कधीच दूर जाऊ नका, तुमच्या वाट्यात कितीही अडचणी येऊ द्या, जर तुमचं ध्येय पक्क असेल तर या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही, जी तुमचा पराभव करू शकते, त्यामुळे माणसाने नेहमी आपलं ध्येय मजबूत ठेवावं, असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)