Chanakya Niti : अशा लोकांकडे गुणवत्ता असूनही लोक करतात दुर्लक्ष, चाणक्य यांनी सांगितली लक्षणं

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात काही लोक हे प्रचंड हुशार असतात, परंतु तरी देखील समाज त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यासाठी त्यांच्यामधील काही गुण कारणीभूत असतात.

Chanakya Niti : अशा लोकांकडे गुणवत्ता असूनही लोक करतात दुर्लक्ष, चाणक्य यांनी सांगितली लक्षणं
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 8:36 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील काळाच्या कसोटीवर उतरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात काही लोक हे प्रचंड हुशार असतात. त्यांच्याकडे प्रचंड अशी प्रतिभा असते. कुठेही लाथ मारली तर पाणी काढण्याची त्यांची क्षमता असते. समाज त्यांचा प्रचंड आदर करतो. त्यांना प्रगतीच्या नव्या संधी देखील मिळतात. परंतु असे देखील काही लोक असतात, ज्यांच्याकडे प्रचंड प्रतिभा असते, ते सर्वगुण संपन्न असतात. तरी देखील समाज त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. अशा लोकांकडे दुर्लक्ष का होतं? तर त्यासाठी त्यांच्यामध्ये असलेले काही दुर्गुण कारणीभूत ठरतात. याच गोष्टींमुळे समाजात त्यांना जो मान मिळायला पाहिजे, त्यासाठी ते पात्र ठरत नाहीत, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मार्केंटिग – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे एखादी वस्तू असेल आणि ती जर तुम्हाला विकायची असेल तर तिचं मार्केंटिग तुम्हाला करता आलं पाहिजे. तुमच्याकडे ही वस्तू आहे, हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही, तोपर्यंत तुमच्याजवळची ती वस्तू विकलीच जाणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे काय गुणवत्ता आहे, हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही, तोपर्यंत तुमच्याकडे लोकांचं लक्ष जाणार नाही, त्यामुळे आपल्याला मार्केटिंग हे जमलच पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिष्टपणा – चाणक्य म्हणतात माणसाच्या अंगी नेहमी नम्रता असावी, जो नम्र असतो तोच खरा ज्ञानी असतो. परंतु काही लोकांना आपल्या ज्ञानाचा गुणवत्तेचा अंहकार होतो. अशा स्थितीमध्ये मग या लोकांकडे समाजाचं दुर्लक्ष होतं. असे लोक नेहमीच मागे पडतात. त्यामुळे तुमच्याकडे नम्रता ही हवीच असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

अबोला – चाणक्य म्हणतात काही लोक हे प्रचंड हुशार असतात. ते कोणतंही काम सहज करू शकतात. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव देखील असतो, परंतु यातील काही लोकांची समस्या ही असते की ते फार बोलत नाहीत. त्यामुळे या व्यक्तीकडे नेमकं काय आहे, याचा अंदाज समोरच्या व्यक्तीला कधीही येत नाही. त्यामुळे तुम्ही जे करत आहात, ते लोकांसमोर प्रभावीपणे मांडायला तुम्ही शिकलं पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us