स्वयंपाकघरात तुमच्याही हातातून वारंवार पडतात का या वस्तू? तर अजिबात या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील वस्तूंबाबत काही नियम दिले आहेत. त्या वस्तूंबाबत बोलायचं झालं तर स्वयंपाकघरात काही वस्तू वारंवार हातून पडत असतील तर ते शुभ मानले जात नाही शिवाय त्याचे संकेतही चांगले मिळत नाहीत. नक्की यामागील कारणे आणि संकेत काय असू शकतात जाणून घेऊयात.

स्वयंपाकघरात तुमच्याही हातातून वारंवार पडतात का या वस्तू? तर अजिबात या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
It is considered inauspicious to constantly spill salt and oil in the kitchen.
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2025 | 6:34 PM

वास्तूशास्त्रानुसार घराबाबत अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात. तसेच घरातील स्वयंपाक घरापासून ते अगदी बाथरुमपर्यंत सर्वांबद्दलचे नियम सांगितले आहेत. तसेच कोणत्या गोष्टी करणे शुभ असते कोणत्या अशुभ असते हे देखील सांगण्यात आलं आहे. वास्तूशास्त्रात स्वयंपाक घराबाबत बरेच नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाकघरातील वास्तू टिप्सनुसार बऱ्याच गोष्टींचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो फक्त ते संकेत ओळखणे महत्त्वाचे असते असं म्हटलं जातं.

वास्तूशास्त्रात स्वयंपाकघरातल्या वस्तूंबद्दल काय सांगण्यात आलं आहे 

वास्तूशास्त्रात स्वयंपाकघरातल्या वस्तूंबद्दल सांगण्यात आलं आहे की स्वयंपाकघरातील काही वस्तूं जर हातातून वारंवार निसटत असतील तर त्यामागे अनेक संकेत लपलेली असतात, ज्याला चुकूनही दुर्लक्षित करता कामा नये. आणि ते संकेत आपण वेळीच ओळखले तर,अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.

या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

स्वयंपाकघरात वारंवार मीठ सांडणे:  शास्त्रांनुसार, जर स्वयंपाकघरात मीठ आणि मोहरीचे तेल वारंवार हातून सांडत असेल तर ते खूप अशुभ मानलं जातं. बऱ्याचदा हातातून मीठ वारंवार खाली सांडत आणि जर असे वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मीठ वारंवार हातून सांडण्याचे संकेत म्हणजे आर्थिक संकट येण्याची चिन्हे असतात.

मोहरीचे तेल : मोहरीचे तेल किंवा स्वयंपाकघरातील जेवणासाठी वापरले जाणारे कोणतेही तेल वारंवार सांडत असेल तर शनि दोषाचे संकेत असू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची उपासना करू शकता, प्रार्थना करू शकता.

या गोष्टी घडमे अशुभ मानले जाते

वारंवार भांडी पडणे: स्वयंपाकघरात वारंवार भांडी पडणे शुभ मानले जात नाही. भांडी पडणे किंवा काही तुटणे, फुटणे हे देखील एखाद्या मोठ्या संकटाचे लक्षण आहे. जर तुमच्या स्वयंपाकघरात वारंवार असे घडत असेल तर सावध रहा. यामुळे येत्या काळात तुमच्या कुटुंबात अशांतता निर्माण होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह देखील होऊ शकतो.

नळातून अनावश्यकपणे पाणी टपकत राहणे: नळातून अनावश्यकपणे पाणी टपकत राहणे हे देखील योग्य नाही. जर नळातून पाण्याचे थेंब टपकत असतील तर हे देखील शुभ मानले जात नाही. हे स्पष्ट लक्षण आहे की लवकरच तुमचा अनावश्यक खर्च होणार आहे. तसेच नळ बिघडला असल्यास त्याकडे दूर्लक्ष न देता तो लगेचच दुरुस्त करावा

 

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)