रविवारी केस कापल्याने हा ग्रह कमकुवत होतो, त्यासाठी या 3 गोष्टी टाळा

ज्योतिषशास्त्रात केस, नखे कापण्याबद्दल तसेच केस धुण्याबद्दलही बऱ्याच गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहेत. त्या गोष्टीच्या नियमांचे पालन केले तर नक्कीच त्याचे फायदे आपल्या आयुष्यात दिसून येतात. सकारात्मक परिणाम होतो. त्यातच एक म्हणजे रविवारी केस कापणे टाळले पाहिजे असे म्हटले जाते. पण यामागे काय कारण आहे जाणून घेऊयात.

रविवारी केस कापल्याने हा ग्रह कमकुवत होतो, त्यासाठी या 3 गोष्टी टाळा
cutting hair
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 12:25 AM

ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टींबद्दल,ग्रहांबद्दल तसेच त्यांच्या आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल सांगण्यात आलं. बऱ्याच गोष्टींबद्दलचे नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन केल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो. दरम्यान ज्योतिषशास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे देखील महत्त्व स्पष्ट करण्यात आलं आहे. हिंदू धर्मात, सोमवार ते रविवार हे कोणत्या ना कोणत्या कारणाने महत्त्वाचे मानले जातात तसेच ते ग्रहाशी संबंधित मानले जातात. रविवार सूर्याशी संबंधित आहे. त्याचा बराच प्रभाव जीवनावरही पडतो असतो. म्हणून, रविवारी या ग्रहाला कमकुवत करू शकतील अशा गोष्टी करणे टाळावे. त्यातीलच एक म्हणजे केस कापने.

केस कापण्याबद्दलही आपल्याकडेच बरीच मान्यता आहेत. कोणत्या दिवशी केस कापावे किंवा कापू नये हे तसेच त्याचे चांगले-वाईट परिणाम काय असू शकतात याबद्दल सांगण्यात आलं आहे. त्यानुसार रविवारी केस कापू नये असे म्हटलं जाते.

केस कापण्यासोबतच रविवारी या गोष्टी करणे टाळा

केस कापू नका: लोक सामान्यतः सुट्टीच्या दिवशी केस कापण्याशी संबंधित कामे करणे पसंत करतात. विश्रांतीसाठी, लोक बहुतेकदा रविवारी केस कापतात आणि दाढी करतात, परंतु शास्त्रांनुसार हे चुकीचे आहे. रविवारी केस कापण्याचे टाळावे. जर असे केले तर सूर्य हळूहळू कमकुवत होतो. सूर्य जसजसा कमकुवत होतो तसतसे त्याच्या आरोग्यावर सर्वात जास्त विपरीत परिणाम होतो. ज्या लोकांचा सूर्य कमकुवत होतो त्यांना अनेकदा आरोग्य समस्या येतात.

हे रंग परिधान करणे टाळा: प्रत्येक दिवस हा एका ग्रहाच्या प्रभावाखाली असतो. प्रत्येक ग्रह एका रंगाशी संबंधित असतो. म्हणून, विशिष्ट दिवसानुसार विशिष्ट रंग टाळणे महत्वाचे आहे. रविवार येतो तेव्हा काळा आणि निळा रंग परिधान करणे टाळावे. रविवारी चार रंग परिधान करणे सूर्याचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी लाल, पिवळा, नारिंगी आणि सोनेरी रंग परिधान करणे शुभ मानले जाते. हे रंग थेट सूर्याशी संबंधित आहेत.

या गोष्टी टाळा: रविवारी, मांस, मद्य यासारखे पदार्थ खाणे टाळावे. तसेच, या दिवशी आंबट पदार्थ खाणे टाळावे. शिवाय, लिंबू, चिंच आणि लोणचे यासारखे पदार्थ खाणे टाळावे. बरेच लोक या दिवशी काळी उडद डाळ देखील खाणे टाळतात.

 

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)