Dasara 2026 : दसऱ्याच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ कामं; जाणून घ्या धार्मिक मान्यता!
यंदा २० ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल. या शुभ दिवशी काही गोष्टी टाळाव्या, असे सांगितले जाते. चला जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत.

दसरा हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, जो असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो. काही ठिकाणी याला विजयादशमी म्हणूनही ओळखले जाते. हा सण दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा दसरा २० ऑक्टोबर २०२६ रोजी साजरा केला जाईल. याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता. तसेच, दुर्गा देवीने नऊ दिवसांच्या युद्धानंतर दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला होता.
दसऱ्याच्या दिवशी रावण दहन म्हणजेच रावणाचा पुतळा जाळला जातो. या दिवशी शस्त्रपूजा करण्याचीही परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी दुर्गा माता आणि प्रभू राम यांची पूजा केली जाते. या दिवशी लोक सुख-समृद्धीसाठी विविध विधी करतात. मात्र, या दिवशी काही गोष्टी करू नयेत अशी मान्यता आहे. चला, दसऱ्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे जाणून घ्या.
दसऱ्याच्या दिवशी काय करू नये?
धार्मिक श्रद्धा आणि परंपरेनुसार, दसऱ्याच्या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजे. या दिवशी कोणते काम करू नये हे खाली वाचा.
तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे – या दिवशी मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण आणि मद्य (दारू) यांसारख्या तामसिक पदार्थांपासून दूर राहावे.
प्राण्यांना इजा पोहोचवणे टाळा – या दिवशी कोणत्याही प्राणी, पक्षी किंवा जीवाला मारू नये किंवा त्याचा छळ करू नये. निसर्ग आणि वनस्पतींनाही इजा पोहोचवू नये.
अपमान आणि वाद टाळा – कोणत्याही स्त्रीचा, वृद्ध व्यक्तीचा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका. या दिवशी वादविवाद, भांडणे किंवा कठोर शब्द टाळा.
या वस्तूंचे दान करणे टाळा – दसऱ्याच्या दिवशी हळद, चामड्याच्या वस्तू किंवा फाटलेले कपडे दान करू नयेत. संध्याकाळी या गोष्टी देऊ नका – अशी धार्मिक श्रद्धा आहे की संध्याकाळी कोणालाही सुई, मीठ किंवा साखर देऊ नये.
शस्त्रे आणि अवजारांकडे दुर्लक्ष करू नका – या दिवशी, तुम्ही वापरत असलेले अवजारे, शस्त्रे किंवा वाहनांची स्वच्छता आणि शस्त्रपूजा केली पाहिजे. हे करायला विसरू नका.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
