AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नका हे काम, अन्यथा पूर्वज होतील नाराज

सोमवती अमावस्या हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी विविध विधी केले जातात. परंतु काही चुका केल्याने पितर या नाराज होऊ शकतात.

सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नका हे काम, अन्यथा पूर्वज होतील नाराज
Somvati Amavasya Image Credit source: Tv9
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 8:15 PM
Share

हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिव आणि पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केले जाते. असे मानले जाते की यामुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. सोमवार हा महादेवाला समर्पित दिवस आहे. या दिवशी महादेवाची उपासना केल्याने मनाला शांती मिळते, जीवनात सुख-समृद्धी येते. सोमवती अमावस्येला दान केल्याने आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. पंचांगानुसार सोमवती अमावस्या 30 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 04:01 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 21 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3:56 वाजता समाप्त होईल. 30 डिसेंबरला अमावस्या असणार आहे.

सोमवती अमावस्येला करू नका ही कामे

  • सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा आणि पिंडदान केले जाते. म्हणूनच या दिवशी पितरांबद्दल वाईट बोलू नये आणि त्यांना तर्पण द्यायला विसरू नये.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रे, गाय आणि कावळे यांना त्रास देऊ नये. या दिवशी या प्राण्यांना त्यांच्या पूर्वजांचा भाग म्हणून त्यांना अन्न दिले जाते. म्हणूनच त्यांना इजा करू नये.
  • अमावस्येच्या दिवशी पिंडदान, तर्पण आणि श्राद्धासाठी पूर्वज वाट पाहत असतात. म्हणूनच या दिवशी सर्व गोष्टी करायला विसरू नये. या गोष्टी करायला विसरले तर पूर्वज रागवतात आणि शाप देतात.
  • सोमावती अमावस्येच्या दिवशी केलेल्या पूजेचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दिवसभर ब्रह्मचर्य पाळावे नाहीतर. पूजेचे पूर्ण फल प्राप्त होत नाही.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी तामसिक वस्तूंना हात लावू नये. चुकूनही मांस आणि मद्य सेवन करू नये. तरच या दिवशी केलेल्या पूजेचे चांगले फळ मिळते.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घरात किंवा आजूबाजूला घाण पसरवू नये. तरच पूजा शुभ होते.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी कुणाशीही भांडण करू नये, तसेच शिवीगाळ आणि अपशब्द देखील कोणाला बोलू नये.

सोमवती अमावस्या विशेष का मानली जाते?

शनी आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस विशेष आहे. शनि देवाच्या साडे सातीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शनि देवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. या दिवशी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नी दोघांनी मिळून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. तसेच ‘ओम पितृभ्यै नमः’ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. असे मानले जाते की यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि पती-पत्नीमध्ये समन्वय साधला जातो.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ