AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : प्रमोशन रखडलंय? कामात अडथळे येतायेत? मग ऑफिसच्या डेस्कवर ठेवा ही एक छोटीशी वस्तू

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. ज्या प्रमाणे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे फेंग शुईमध्ये देखील काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Feng Shui : प्रमोशन रखडलंय? कामात अडथळे येतायेत? मग ऑफिसच्या डेस्कवर ठेवा ही एक छोटीशी वस्तू
Feng ShuiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 9:55 PM
Share

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की, आपल्याला करायचं एक असतं, परंतु दुसरंच काहीतरी घडतं. आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत. ऑफिसमध्ये देखील कामात मन लागत नाही. आयुष्यात सारखे चढ-उतार सुरू असतात. आपण स्थिर आयुष्याचा शोध घेतो, परंतु आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारामुळे आपली चिंता वाढते. अनेकदा आपण ज्या गोष्टींसाठी पात्र असतो, त्या गोष्टी आपल्याला ऑफिसमध्ये मिळत नाही, तो मान-सन्मान मिळत नाही. प्रमोशन रखडतं. अशा स्थितीत काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो, त्यासाठी फेंग शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. फेंग शुई हे एक जगप्रसिद्ध चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईनुसार जर तुम्हाला तुमच्या मानासारख्या काही गोष्टी घडाव्या वाटत असतील तर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर कासवाची मूर्ती ठेवू शकता. कासवाला स्थिरता आणि प्रगतीचं प्रतिक मानलं जातं. चला तर मग जाणून घेऊयात ऑफिसच्या डेस्कवर कासवाची मूर्ती ठेवण्याचे काय फायदे आहेत? त्याबद्दल.

करियरमध्ये प्रगती – तुम्ही प्रचंड मेहनत करत आहात, ऑफिसमध्ये मना लावून काम करत आहात, परंतु असं असताना देखील तुम्हाला जर तुमच्या करियरमध्ये फार ग्रोथ दिसत नसेल, जर तुमचं प्रमोशन रखडलं असेल किंवा तुम्ही एखाद्या नवी चांगल्या संधीच्या शोधात असाल तर अशावेळी हा सोपा उपाय तुम्ही करू शकता, तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर कासवाची मूर्ती ठेवा. मात्र ही मूर्ती ऑफिसच्या डेस्कवर ठेवत असताना नेहमी एका गोष्टीची काळजी घ्या, ती म्हणजे कासवाचं तोंड हे नेहमी उत्तर दिशेला हवं, यामुळे हळुहळु नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या करयिरमध्ये दिसून येतो, असं फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

पैसा टिकत नसेल तर – अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं, ते प्रचंड मेहनत करतात, खूप पैसा कमवतात. मात्र त्यांच्या हातात कधीही पैसा टिकत नाही. त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता, या उपायामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतील असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार