Feng Shui : प्रमोशन रखडलंय? मग फेंग शुईचे हे सोपे उपाय कराच, सर्व अडचणी होतील दूर
फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईमध्ये तुमच्या आयुष्यात येणाऱ्या दैनंदिन अडचणींवर छोटे-छोटे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे तुमच्या भोवतालची नकारात्मक ऊर्जा कमी होऊन, सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा शुभ परिणाम हा तुमच्यावर होतो, चलातर मग आज आपण अशाच एका उपायाबद्दल जाणून घेऊयात.

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. आपल्या दैनंदिन आयष्यात ज्या अडचणी येतात, त्या दूर करण्यासाठी फेंग शुईमध्ये काही सोपे -सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. फेंग शुईनुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात होते. या अडचणी दूर करण्यासाठी ऊर्जा संतुलन साधणं गरजेचं असतं. ऊर्जा संतुलन साधण्यासाठी फेगं शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांना ऑफिसच्या कामामध्ये अडथळे येतात, प्रमोशन होत नाही, लवकर पगार वाढ होत नाही, या सर्व गोष्टी अवतीभोवती असलेल्या नकारात्मक गोष्टींमुळे घडत असतात, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकतात.
घड्याळ – फेंग शुईनुसार तुम्ही तुमच्या डेस्कवर घड्याळ ठेवल्यास निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम हा तुमच्या कामावर होतो. फेंग शुईनुसार घड्याळाला गतीचं प्रतिक माण्यात आलं आहे. फक्त कधीही हे घड्याळ बंद पडणार नाही, याची काळजी घ्यावी, कारण बंद घड्याळ घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं.
कासवाची मूर्ती – तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर कासवाची मूर्ती देखील ठेवू शकतात. फेंग शुईमध्ये कासवाला स्थिरतेचं प्रतिक मानलं जातं. ऑफिसच्या डेस्कवर कासवाची मूर्ती ठेवण्याचा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.
लाफिंग बुद्धा – फेंग शुई शास्त्रानुसार ऑफिसमध्ये तुम्ही लाफिंग बुद्धाची मूर्ती देखील ठेवू शकतात, कारण यामुळे वातावरणात सकारात्मकता निर्माण होऊन, तुमच्या आजूबाजूचं वातावरण आनंदी होण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)