Jain Diksha : न्यायाधीश बनली पण प्रखरश्रीने जॉइनिंग आधीच घेतली जैन धर्माची दीक्षा, कारण..

Jain Diksha : दीक्षा घेण्यासाठी बैतूल सकल जैन समाजाच्या सहकार्याने खास धार्मिक समारंभ आयोजित करण्यात आलेला. या कार्यक्रमात विंटेज कार, आकर्षक शाही बग्गी आणि राजस्थान उदयपूरहून आलेल्या बँडने आकर्षण वाढवलं.

Jain Diksha : न्यायाधीश बनली पण प्रखरश्रीने जॉइनिंग आधीच घेतली जैन धर्माची दीक्षा, कारण..
Jain Diksha
| Updated on: Nov 02, 2026 | 7:59 AM

मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये रविवारी आस्था, भक्ती आणि वैराग्य यांचा अनोखा संगम पहायला मिळाला. जैन धर्माची दीक्षा घेणाऱ्या पाच दीक्षार्थी बहि‍णींच्या सन्मानार्थ बिनौली चल समारंभ आयोजित करण्यात आलेला. यात बैतूलची मुलगी आणि नगर गौरव ब्रह्मचारिणी प्रखरश्री दीदीचा सुद्धा समावेश आहे. खास बाब म्हणजे प्रखरश्री न्यायाधीशाच्या परीक्षेत उर्तीण झाली होती. पण जज म्हणून काम करण्याआधीच प्रखरश्रीने संयम आणि वैराग्याचा मार्ग निवडला. दीक्षा घेण्यासाठी बैतूल सकल जैन समाजाच्या सहकार्याने खास धार्मिक समारंभ आयोजित करण्यात आलेला. या कार्यक्रमात विंटेज कार, आकर्षक शाही बग्गी आणि राजस्थान उदयपूरहून आलेल्या बँडने आकर्षण वाढवलं. रस्त्यावरुन खास मिरवणूक काढण्यात आलेली. त्यात मोठ्या संख्येने जैन समाजाचे लोक आणि दूरदूरहून आलेले भाविक सहभागी झालेले.

ठिकठिकाणी हार-तुरे आणि घोषणा देऊन पाच दीक्षार्थी बहि‍णींचं स्वागत करण्यात आलं. संपूर्ण रस्त्यावर भक्ती आणि उत्साहाचा माहौल होता. चल समारोह जैन दादावाडी येथे संपन्न झाला. दीक्षा घेणाऱ्या पाच बहि‍णींसाठी पारंपारिक विधी पूर्ण करण्यात आले. ‘मी न्यायाधीशाची परीक्षा उर्तीण व्हावी अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती’ असं प्रखरश्री दीदीने सांगितलं. परीक्षा क्वालिफया करुन प्रखरश्रीने आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. बालपणापासूनच तिच्या मनात वैराग्याची भावना होती.

Loading...

प्रखरश्री दीदीने हा मार्ग का स्वीकारला?

“जज किंवा वकिल बनून मला समाजाची तितकी सेवा करता येणार नाही, जितकी भगवान महावीर यांनी सांगितलेला मार्ग अनुसरुन करता येईल” असं प्रखरश्री दीदीने सांगितलं. याच भावनेमुळे सांसारिक जीवन सोडून संयमाचा मार्ग प्रखरश्री दीदीने स्वीकारला. दीक्षार्थी रंगोली दीदी म्हणाली की, “ही प्रत्येक मुलीच्या निरोपाची वेळ आहे. आता रंगीत वस्त्रामध्ये आहे. पण दीक्षा घेतल्यानंतर सफेद वस्त्र धारण करणार”

दीक्षा कधी घेणार?

प्रखरश्री दीदीसह चार अन्य दीक्षार्थी बहिणी सुद्धा 22 नोव्हेंबरला दीक्षा घेतील. त्याआधी कुटुंब आणि जैन समाजाने त्यांच्या सन्मानासाठी भव्य बिनौली म्हणजे मिरवणूक काढली. संसारिक सुख सोडून वेगळा मार्ग अनुसरणाऱ्या या बहि‍णींच्या निर्णयाचं बैतूलच्या जैन समाजाने आत्मीयतेने अभिनंदन केलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us