AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2026 : ऑफिसमध्ये करताय गणरायाची स्थापना! मुर्ती खरेदी करताना ‘या’ चुका कधीच करु नका

Ganesh Chaturthi 2026 : अनेकांच्या ऑफिसमध्ये गणरायाची स्थापना होते. पण ऑफिसमध्ये गणपती स्थापन करण्याचे काही नियम आहे. ऑफिसमध्ये गणरायाची स्थापना करायची असेल तर, मुर्ती खरेदी करताना आणि स्थापना करताना कधीच या चुका करु नका...

Ganesh Chaturthi 2026 : ऑफिसमध्ये करताय गणरायाची स्थापना! मुर्ती खरेदी करताना 'या' चुका कधीच करु नका
| Updated on: Sep 12, 2026 | 8:16 AM
Share

Ganesh Chaturthi 2026 : सोमवारी गणरायाचं आगमन होणार आहे. अनेकांच्या घरात गणरायाची स्थापना होणार आहे. सार्वजनिक मंडळं देखील गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. पण अनेकांच्या ऑफिसमध्ये देखील गणरायाची स्थापना करतात. पण मुर्तीची खरेदी करताना काही महत्त्वाचे नियम पाळले पाहिजे. ऑफिसमध्ये गणपती बाप्पाची स्थापना करताना, मूर्तीच्या सोंडेची दिशा, रंग, मुद्रा आणि स्थापनेच्या वेळेकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे. चुकीच्या मूर्तीची निवड टाळण्यासाठी आणि सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या. गणेशोत्सवादरम्यान, भक्त आपल्या कार्यालयांमध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात, नऊ दिवस विधीपूर्वक पूजा करतात आणि दहाव्या दिवशी मूर्तीचं पाण्यात विसर्जन करतात.

जर तुम्हीही यंदाच्या वर्षी ऑफिससाठी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा विचार करत असाल, तर खरेदी करण्यापूर्वी काही विशेष धार्मिक नियम लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चुकीच्या मूर्तीची निवड केल्याने वास्तूवर आणि सुख-समृद्धीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

स्थापनेची दिशा कोणती असली पाहिजे, हे देखील लक्षात ठेवा. गणेशाची मूर्ती स्थापित करताना दिशेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. गणेशाची मूर्ती नेहमी ईशान्य कोपऱ्यात स्थापित करावी आणि मुर्तीचं तोंड नेहमी उत्तरेकडे असावं. याशिवाय, गणेशाची मूर्ती पश्चिम दिशेला स्थापित करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं.

जेव्हा कधी तुम्ही बाप्पाची मूर्ती ऑफिसमध्ये आणता, तेव्हा तिची सोंड डावीकडे असेल याची खात्री करा. यामुळे आनंद आणि सुख नांदते. घरात नेहमी बसलेल्या गणेशाची मूर्ती आणि कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी उभ्या गणेशाची मूर्ती आणणं शुभ मानलं जातं. यामुळे धनाची कधीही कमतरता भासत नाही.

गणेशाची मूर्ती सिंदूरी रंगात खरेदी करणं सर्वोत्तम असतं. यामुळे घरात आनंद आणि शांती टिकून राहते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. घरात किंवा ऑफिसमध्ये गणेशाची स्थापना करताना, त्याचे तोंड कधीही दक्षिण दिशेला नसावं, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकतं.

एकाच मूर्तीची स्थापना करा. कार्यालयात फक्त एकच गणेश मूर्ती स्थापित करावी. वास्तूनुसार, एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊ शकतो. नैसर्गिक दगड किंवा मातीपासून बनवलेली मूर्ती नेहमीच अधिक शुभ मानली जाते.

बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केव्हा आणि कशी करावी? गणेशाची मूर्ती दुपारी स्थापित करणं सर्वात शुभ मानलं जातं. स्थापनेच्या वेळी कलश देखील स्थापित करावा. कलशात आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवा आणि त्यावर एक नारळ ठेवा आणि कुंकू लावावे. चैरंगावर पिवळं कापड पसरा आणि त्यावर गणेशाची मूर्ती ठेवा. जोपर्यंत बाप्पा कार्यालयात आहेत, तोपर्यंत दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आणि बाप्पाची आरती आणि विधीवत पूजा करा.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच