AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2026: यंदा घरी गणपती बसवता येणार नाही? चिंता नको, ‘या’ पद्धतीने करा बाप्पाची भक्ती

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवाच्या काळात घरात गणपतीची मूर्ती नसली तरी गणपतीची प्रतिमा किंवा फोटो समोर ठेवून मनोभावे पूजा करता येऊ शकते. सकाळ-संध्याकाळ दिवा लावून आरती करावी आणि बाप्पाला फुले अर्पण करावीत. शक्य असल्यास कुटुंबीयांसोबत गणपतीची कथा, स्तोत्र किंवा मंत्रजप करावा.

Ganesh Chaturthi 2026: यंदा घरी गणपती बसवता येणार नाही? चिंता नको, ‘या’ पद्धतीने करा बाप्पाची भक्ती
Ganapati BappaImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 12, 2026 | 12:42 PM
Share

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि उत्साहाने साजरा होणाऱ्या सणांपैकी एक आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणरायाची स्थापना केली जाते. बाप्पाच्या आगमनाने घरातील वातावरण भक्तिमय होतं. मात्र काही वेळा प्रवास, घरातील महत्त्वाचं काम, जागेची अडचण किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे इच्छा असूनही घरी गणेशमूर्तीची स्थापना करता येत नाही. अशावेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे घरी बाप्पाची स्थापना करता आली नाही तर काय करायचं? धार्मिक श्रद्धेनुसार, गणपतीची भक्ती करण्यासाठी केवळ मोठी मूर्ती घरी आणणं आवश्यक नाही. मनापासून केलेली पूजा, नामस्मरण आणि श्रद्धा यांनाही तितकंच महत्त्व दिलं जातं. त्यामुळे यंदा घरी गणपती बसवता आला नाही म्हणून निराश होण्याची गरज नाही.

गणरायाचं नामस्मरण करा

जर घरी मूर्तीची स्थापना शक्य नसेल, तर गणपतीचं मनोभावे स्मरण करता येईल. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत आणि शांत ठिकाणी बसून ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करावा. आपल्या श्रद्धेनुसार गणपती अथर्वशीर्ष, गणेश स्तोत्र किंवा आरतीचं पठणही करता येऊ शकतं.

देवळात जाऊन दर्शन घ्या

घरी गणपती बसवता आला नाही, तर जवळच्या गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेणं हा देखील भक्तीचा सुंदर मार्ग आहे. शक्य असल्यास गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करावी. मंदिरातील आरतीमध्ये सहभागी होऊन प्रसाद घ्यावा.

नैवेद्य आणि प्रसाद अर्पण करा

गणपतीला मोदक विशेष प्रिय मानले जातात. घरी मूर्ती नसली तरी आपल्या श्रद्धेनुसार मोदक किंवा आवडता नैवेद्य तयार करून मंदिरातील गणरायाला अर्पण करू शकता. त्यानंतर तो प्रसाद कुटुंबीयांमध्ये वाटता येईल.

दानधर्म आणि सेवाही महत्त्वाची

गणेशोत्सवाच्या काळात गरजू व्यक्तीला अन्न, धान्य किंवा आवश्यक वस्तूंचं दान करणं हा देखील चांगला पर्याय ठरू शकतो. आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं, प्राणी-पक्ष्यांसाठी अन्न-पाणी ठेवणं किंवा सामाजिक उपक्रमात सहभागी होणं यातूनही सकारात्मक भावना जपता येते.

श्रद्धा सर्वात महत्त्वाची

गणेशोत्सवाचा खरा अर्थ केवळ सजावट किंवा मोठ्या उत्सवापुरता मर्यादित नाही. बाप्पाबद्दलची श्रद्धा, चांगले विचार, संयम आणि इतरांना मदत करण्याची भावना यांनाही महत्त्व आहे. त्यामुळे परिस्थितीमुळे घरात गणेशमूर्तीची स्थापना करता आली नाही, तरी मनापासून केलेली गणरायाची भक्ती नक्कीच करता येते.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...