महिलांनी चुकूनही या दिवशी केस धुवू नयेत, अन्यथा घरात येईल दारिद्र्य

महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी केस धुणे टाळावे. याबाबत काही नियम देण्यात आले आहेत. हे नियम श्रद्धांवर आधारित आहे. हे नियम पाळले नाहीत तर दारिद्र्यता येऊ शकते असं म्हटलं जातं.

महिलांनी चुकूनही या दिवशी केस धुवू नयेत, अन्यथा घरात येईल दारिद्र्य
Hair washing days for women
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 29, 2025 | 5:19 PM

हिंदू धर्मात महिलांनी केस धुण्याबाबत काही मान्यता आहेत, त्यानुसार काही दिवशी केस धुणे शुभ मानले जाते तर काही दिवशी अशुभ. या श्रद्धा बहुतेकदा ज्योतिषशास्त्रीय प्रभावांमुळे आणि विशिष्ट दिवसांना विशिष्ट देवतांशी जोडल्यामुळे असू शकतात. या श्रद्धा पारंपारिक असतात असं मानलं जातं. या प्रथा वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या असू शकतात. काही लोक या रीतिरिवाजांचे काटेकोरपणे पालन करतात. तर काही जण त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. आपण गरजेनुसार किंवा स्वच्छतेच्या कारणास्तव केस धुण्यासाठी दिवस कोणता आहे हे फार पाहत नाही किंवा पाळत नाही. पण ज्योतिषशास्त्रानुसार असे काही दिवस आहेत ज्या दिवशी केसं धुणे टाळले पाहिजे असं म्हटलं जातं.

विशेषत: महिल्यांच्याबाबतीत हे नियम जास्त पाळले जातात. धार्मिक मान्यतेनुसार महिलांचे केस धुण्याबाबत काही नियम सांगितले आहेत. या समजुतींनुसार, विवाहित महिलांनी दररोज केस धुवू नये. तसेच केसं धुण्याच्याबाबतीत विवाहित महिलांसाठीही काही नियम आहेत. जसे की मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विवाहित महिलांनी केसं धुणे अशुभ आहे. शुक्रवार आणि रविवारी केस धुणे विवाहित महिलांसाठी शुभ मानले जाते.

महिलांनी केसं धुण्याबाबत पाळायचे नियम

असे म्हटले जाते की विवाहित महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस धुवू नयेत. या दिवशी केस धुण्याने पतीला दुर्दैव येतं तसेच घरात दारिद्र्य येतं

शुक्रवार: हा दिवस लक्ष्मीला समर्पित आहे आणि केस धुण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. या दिवशी केस धुण्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि सौंदर्य देखील वाढते.

रविवार: हा दिवस केस धुण्यासाठी योग्य मानला जातो, परंतु विवाहित महिलांसाठी नाही, अविवाहित मुली आणि पुरुष या दिवशी केस धुवू शकतात.

बुधवार: अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुवू नयेत कारण असे मानले जाते,कारण यामुळे त्यांच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात.

या परिस्थितीतही केस धुणे टाळावे 

तसेच विवाहित महिलांनी एकादशीला केस धुवू नयेत. अमावस्या, पौर्णिमा आणि ग्रहण या दिवशीही केस धुण्याने स्त्रियांचे सर्व पुण्य कर्म कमी होतात आणि पूर्वजांचा द्वेश स्विकारावा लागतो.

सूर्यास्ताच्या वेळी आणि रात्री केस धुण्यामुळे घरात त्रास होतो आणि आजारपण येते. शारीरिक अशुद्धता किंवा संभोगानंतर, तसेच काही मांसाहार केल्यानंतर केस धुणे आणि आंघोळ करणे आवश्यक आहे.

मंदिरातून परतल्यानंतर किंवा कोणत्याही शुभ कार्यानंतर लगेच केस धुण्यास मनाई आहे. असे केल्याने सौभाग्य नष्ट होते अशी मान्यता आहे.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)