
हिंदू धर्मात, निसर्गासोबतच, प्राण्यांबाबतही शास्त्रांमध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. असे अनेक पक्षी आहेत जे शुभ तसेच अशुभ मानले जातात. तसेच पक्षांचे आपल्या घरात येणे किंवा घरटे बांधणे यावर देखील शुभ किंवा अशुभ संकेत अवलंबून असतात. जसं की ज्योतिषशास्त्रानुसार, घरात पक्षी, गिधाडे किंवा कावळे, चिमणी यांचे घरटे खूप महत्वाचे संकेत देतात.
शास्त्रात पक्ष्यांशी संबंधित काही शुभ आणि अशुभ संकेतांचे वर्णन
अनेकदा पाहिलं असेल की पक्षी आपल्या घरातील एखाद्या कोपऱ्यात किंवा बाल्कनीमध्ये घरटे बनवतात.अशा पक्ष्यांचे आगमन आणि आपल्या घरात त्यांचे वास्तव्य व्यक्तीला काही विशेष संकेत देतात. शास्त्रात पक्ष्यांशी संबंधित काही शुभ आणि अशुभ संकेतांचे वर्णन केले आहे.
घरात पक्षी किंवा चिमणीने घरटे बांधणे
चिमणी : ज्योतिषशास्त्र असे मानते की घरात पक्षी किंवा चिमणीने घरटे बांधणे घरातील सदस्यांसाठी शुभ असते. ज्या घरात पक्षी घरटे बांधतो त्या घरात समृद्धी, सुख येते आणि दुर्दैवाचेही सौभाग्यात रूपांतर होऊ शकते.
मैना : शास्त्रांनुसार, मैना हा एक शुभ पक्षी मानला जातो. तो सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे. तो घरात सकारात्मक ऊर्जा आणि गोडवा दर्शवितो. जर मैना वारंवार घरात येत असेल किंवा घरटे बांधत असेल तर ते प्रेम आणि संपत्ती वाढण्याचे संकेत देते. मैना घरटे बांधल्याने खूप शुभ परिणाम मिळतात.
पोपट : पोपट बऱ्याचदा अनेक घरांमध्ये दिसतात. त्यांना शहाणपण, सौभाग्य आणि सुंदर वाणीचे प्रतीक मानले जाते. जर पोपट तुमच्या घरात अचानक कुठून उडून आला आणि तो घरात राहिला तर ते सूचित करते की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगली बातमी येणार आहे. करिअरमध्ये, व्यवसायात प्रगतीचे दरवाजे उघडतील असे म्हटले जाते.
या पक्ष्यांनी तुमच्या घरात घरटे बांधणे किंवा घरात प्रवेश करणे अशुभ मानले जाते
वटवाघुळ : वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात अचानक वटवाघुळ आले तर ते अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरात अचानक वटवाघुळ येणे हे भविष्यात काही प्रकारच्या दुर्दैवाचे लक्षण मानले जाते.
कावळा : शास्त्रांनुसार, कावळा हा पूर्वजांचा दूत मानला जातो. तथापि, जर तो घरात वारंवार घरटे बांधत असेल तर ते शुभ मानले जात नाही. त्याच्या घरट्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि पूर्वजांचा शाप देखील येतो.
गरुड किंवा गिधाड : गरुड किंवा गिधाड हे दुर्मिळ पक्षी आहेत, परंतु जर त्यांनी घरात घरटे बांधले तर ते नकारात्मकता आणते आणि ते मृत्यूचे प्रतीक मानले जाते. घरात गरुड किंवा गिधाडाचे घरटे बांधणे हे गंभीर वास्तुदोषाचे लक्षण आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)