AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neem Karoli Baba: नीम करोली बाबांची पत्नी कोण?  संन्यास घेतल्यावर पुढे संसाराचं झालं काय?

Neem Karoli Baba Wife: हनुमान अंश चित्रपटामुळे अनेकांना नीम करोली बाबा यांच्याविषयी जाणून घ्यायचे आहे. त्यांचे लग्न झाले होते का? त्यांच्या पत्नीचे नाव काय होते? संत झाल्यावर त्यांच्या संसाराचं पुढे काय झालं? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत.

Neem Karoli Baba: नीम करोली बाबांची पत्नी कोण?  संन्यास घेतल्यावर पुढे संसाराचं झालं काय?
नीम करोली बाबा
| Updated on: Sep 05, 2026 | 12:11 PM
Share

नीम करोली बाबा नाव ऐकताच अनेकांच्या मनात एक छबी तयार होते. त्यांचे भक्त केवळ भारतातच आहेत असं नाही तर देशविदेशातही त्यांचे भक्त आहेत. उत्तराखंडमधील कैची धाम ते अमेरिकेपर्यंत त्यांच्या कार्याची महत्त्वी पसरली आहे. जगातील अनेक दिग्गज त्यांचे भक्त होते. पण त्यांच्या सांसारिक जीवनाचा एक भाग ही आहे. जो अनेकांना माहिती नाही. त्यांचे लग्न झाले होते का? त्यांच्या पत्नीचे नाव काय होते? संत झाल्यावर त्यांच्या संसाराचं पुढे काय झालं? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. बाबांनी संन्यास घेतल्यावर त्यांच्या पत्नीने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. काय आहे याविषयीची माहिती?

नीम करोली बाबांचे गृहस्थ जीवन, अनेक लोकांना नाही माहिती

नीम करोली बाबांचा जन्म हा उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावात झाला होता. त्यांचे मूळ नाव लक्ष्मण दास शर्मा असल्याचे सांगण्यात येते. बालपणातच त्यांचा ओढा धार्मिक कार्याकडे होता. त्यावेळच्या परंपरेनुसार, त्यांचे लहान वयातच लग्न लावण्यात आले होते. याविषयीच्या दाव्यानुसार, त्यांचे लग्न जवळपास 11–12 व्या वर्षी करण्यात आले होते. पण पुढे त्यांनी संन्यास स्वीकारला. त्यांनी लग्न झाल्याचे कधी लपवले नाही.

नीम करोली बाबा यांच्या पत्नीचे नाव काय?

नीम करोली बाबा यांच्या पत्नीचे नाव राम बेटी देवी (Ram Beti Devi) असल्याचे सांगण्यात येते. उत्तर प्रदेशातील एका ब्राह्मण कुटुंबातील राम बेटी देवी या लग्नानंतर अकबरपूर गावात आल्या. बाबांच्या आध्यात्मिक जीवनाची चर्चा होत असली तरी राम बेटी देवी या चर्चांपासून दूर असल्याचे दिसते. त्या कधी आश्रमाच्या व्यवस्थापनात असल्याचे दिसून येत नाही. गावातील लोक त्या अत्यंत साध्या आणि सरळ स्वभावाच्या असल्याचे सांगतात.

संन्यास घेतल्यानंतर पत्नीचे आयुष्य कसे होते?

लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी लक्ष्मण दास यांनी संन्यास स्वीकारला. ते अध्यात्मिक यात्रेवर निघाले. अनेक वर्ष ते देशभरात फिरले. या काळात त्यांना लोक विविध नावांनी ओळखत होते. पण ते नीम करोली बाबा या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी घराकडे पाठ फिरवल्यानंतर राम बेटी देवी यांनी घराची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्या शेतात राबत आणि घरची कामं करीत. त्यांनी मुलांना वाढवले. त्यांचे आयुष्य एखाद्या संताच्या पत्नीप्रमाणे नाही तर ग्रामीण भागातील महिलेसारखे होते.

नीम करोली बाबा कुटुंबाला भेटत होते?

अनेकांना अशी उत्सुकता आहे की, नीम करोली बाबा हे त्यांच्या मूळ गावी अकबरपूर येथे यायचे का? पत्नीसह कुटुंबियांना भेटायचे का? तर बाबा अनेकदा अकबरपूर गावात आले. ते कुटुंबाला भेटले. पण त्यांचा मोठा वेळ हा साधना आणि धार्मिक यात्रांमध्ये जात होता. या कालावधीत ते भक्तांशी संवाद साधायचे. आध्यात्मिक चर्चा करायचे.

Follow Us
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी