नीम करोली की नीब करोरी? दोन नावाचं काय रहस्य? कोणते नाव योग्य? कोणत्या राज्यात बाबाचं घर, तुम्हाला माहिती आहे का?
Neem Karoli Baba History in Marathi: नीम करोली बाबांवर आधारीत हुनमान अंश या सिनेमाने मोठे विक्रम रचले आहेत. त्याचवेळी बाबांची दोन नावं सुद्धा समोर आली आहेत. नीम करोली की नीब करोरी? यापैकी कोणतं नाव योग्य आहे? काय आहे त्यामागील रहस्य? या राज्यातील फिरोजाबाद शहरात बाबाचं घर आहे.

20 शतकातील सर्वाधिक रहस्यमयी आणि कोट्यवधी भक्तांचे आराध्य दिव्य संत नीम करोली बाबा यांच्यावरील हनुमान अंश हा चित्रपट सध्या गाजत आहे. या सिनेमाने अनेक विक्रम मोडीत काढले आहे. अवघ्या दोन कोटी बजेट असलेल्या या फिल्मने कमाईचे रेकॉर्ड तयार केले आहे. नीम करोली बाबांचे भक्त त्यांना हनुमानाचा अवतार मानतात. उत्तराखंडमधील नैनीतालजवळील कैंची धाम येथे त्यांचे आश्रम आहे. पण काही भक्त बाबांना नीब करोरी या नावाने सुद्धा ओळखतात. नीम करोली की नीब करोरी? यापैकी कोणतं नाव योग्य आहे? काय आहे त्यामागील रहस्य? या राज्यातील फिरोजाबाद शहरात बाबाचं घर आहे.
नीब करोरी बाबा असं का म्हटल्या जाते?
बाबांचा जन्म हा उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावातील आहे. ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव लक्ष्मी नारायण शर्मा असे होते. लक्ष्मी नारायण जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांनी गृहत्याग केला. ते साधू , संत झाले. घर सोडल्यानंतर ते फर्रुखाबाद जिल्ह्यातील नीब करोरी गावात पोहचले. तिथे एका गुफेत त्यांनी कठोर साधना केली. या गावातील लोकांनी त्यांना नीब करोरी बाबा असे नाव दिले.
नीम करोली बाबाच्या नावाचे रहस्य काय?
नीब करोरी येथून बाबा पुढे उत्तराखंडमधील कैंची धाम येथे आले. पण त्यामागे एक रोचक कथा आहे. त्यानुसार बाब रेल्वेच्या फर्स्ट क्लास कोचमधून प्रवास करत होते. त्यांच्याकडे तिकिट नव्हते. मग टीटीई ने त्यांना खाली उतरून दिले. ज्या स्टेशनजवळ त्यांना उतरवले. तिथे एका निंबाच्या झाडाखाली ते बसले. इकडे रेल्वेचे इंजिन तर सुरू झाले. पण रेल्वे काही जागची हलली नाही. प्रवाशांना आणि टीटीईला हा प्रकार लक्षात आला. टीटीईने बाबांकडे जाऊन माफी मागितली. त्यानंतर बाबा हे त्याच्या डब्यातून पुढील प्रवासासाठी निघाले. त्यामुळे त्यांचे नाव नीम करोली बाबा असे पडले.
गावात बाबांचे घर कुठे?
नीम करोली बाबांचे घर फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला तहसलीजवळील अकबरपूर गावात आहे. सध्या त्यांच्या वडीलांच्या घराला श्री ठाकुर हनुमान जी ट्रस्टचे व्यवस्थापन आहे. काही दिवसांपूर्वी नीम करोली बाबा यांच्या 6 नातींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हे घर ताब्यात देण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यांची एक समिती गठित केली आहे. जर प्रशासनाने लवकर निर्णय घेतला नाही तर कोर्टाचा दरवाजा ठोठावू असी इशारा नातींनी दिला आहे.
