AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...

Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले…

| Updated on: Sep 04, 2026 | 12:55 PM
Share

पुण्यातील मारहाणीनंतर सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. गणेशोत्सवातील DJ आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे बापट चर्चेत आले असून, त्यांच्या या मागणीला आता संघटनात्मक स्वरूप देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना 24 तास पोलीस सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांच्या समर्थनार्थ रविवारी काही नागरिकांकडून मोर्चाही काढण्यात येणार आहे.

पुण्यातील मारहाणीनंतर सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. गणेशोत्सवातील DJ आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे बापट चर्चेत आले असून, त्यांच्या या मागणीला आता संघटनात्मक स्वरूप देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना 24 तास पोलीस सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांच्या समर्थनार्थ रविवारी काही नागरिकांकडून मोर्चाही काढण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना विद्यानंद बापट यांनी आपले व्यक्तिमत्त्व मोठे करण्यापेक्षा आपण मांडत असलेले मुद्दे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. “मला माझं व्यक्तिमत्त्व वाढवायचं नाही. माझे मुद्दे पुढे जात असतील, तर ते मला महत्त्वाचं आहे,” असे बापट म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ देत व्यक्तिमत्त्व वाढवणे घातक असल्याचेही त्यांनी सांगितले. DJ आणि ध्वनीप्रदूषणाविरोधातील भूमिकेमुळे काही जणांच्या भावना दुखावत असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपावर बापट यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “भावना म्हणजे हात, पाय, छाती दुखण्यासारखा भाग नाही. हा हास्यास्पद कांगावा आहे,” असे ते म्हणाले. भावना दुखावल्याच्या नावाखाली अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

गणेशोत्सवाच्या इतिहासाचा संदर्भ देताना बापट यांनी लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे आणि आगरकर यांच्या विचारांचाही उल्लेख केला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळातील विविध विचारधारांचा संदर्भ देत उत्सव आणि सामाजिक विचार यावर त्यांनी भाष्य केले. दरम्यान, ध्वनीप्रदूषणासोबत नदीप्रदूषणाचाही प्रश्न गंभीर असल्याचे बापट यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शाडूच्या मूर्तींचा आग्रह करत असल्याचा संदर्भ देत, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबतही गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. “ध्वनीप्रदूषणात बोलायची सोय होत नाही, त्यामुळे त्यावर अधिक भर दिला आहे,” असे बापट यांनी स्पष्ट केले.

आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही बापट यांनी भाष्य केले. त्यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने गणपतीची स्थापना केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, वैयक्तिक श्रद्धा किंवा पूर्वीच्या प्रथा यापेक्षा “आताची भूमिका महत्त्वाची आहे,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या आपल्या भूमिकेवर भर दिला. पुण्यातील मारहाणीनंतर बापट यांच्या DJ बंदीच्या मागणीला आता अधिक व्यापक आणि संघटनात्मक स्वरूप देण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील DJ आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

 

 

Published on: Sep 04, 2026 12:55 PM

Follow Us