
भारतीय संस्कृतीत लग्न करताना अनेक परंपरा पाळल्या जातात. यातील एकमेकांना हार घालण्याची परंपरा ही खास आणि महत्त्वाची आहे. ही केवळ फुलांची देवाणघेवाण नसून एक महत्त्वाचा विधी आहे. याविधीवेळी वधू आणि वर एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की हार घालण्याच्या विधीमध्ये नवरी प्रथम नवरदेवाला हार घालते आणि नंतर नवरदेव वधूला हार घालतो. यामागे काय कारण आहे याचा तुम्ही विचार केला आहे का? याबाबत सविस्तर माहिती सविस्तर जाणून घेऊयात.
तुम्हाला माहिती असेल की प्राचीन भारतात स्वयंवर नावाची एक परंपरा होती. या परंपरेत पात्र राजपुत्रांना आमंत्रित केले जात असे आणि राजकुमारी तिच्या पसंतीच्या वराला हार घालत असे आणि त्यानंतर त्या दोघांचे लग्न होत असे. हा हार घालण्याचा समारंभ स्वयंवरातील सर्वात महत्वाचा क्षण असायचा कारण ते वधूने निवडलेल्या वराचे प्रतीक होता. त्यामुळे अशीच परंपरा आजही दिसून येते. जेव्हा नवरी नवरदेवाला हार घालते तेव्हा ती जीवनसाथी म्हणून त्याचा स्वीकार करते.
रामायणातही याचा संदर्भ आहे, जनकपुरी येथे झालेल्या स्वयंवरात, राजा जनक वरींची परीक्षा आयोजित केली होती. जो व्यक्ती भगवान शिवाचे धनुष्य उचलू शकतो आणि दोरीने बांधू शकतो त्याचे लग्न सीतेशी लाले जाईल असं राजा जनक यांनी म्हटले होते. जेव्हा श्रीरामांनी धनुष्य उचलले आणि तोडले त्यावेळी माता सीतेने रामाच्या गळ्यात हार घातला. तेव्हापासून नवरीवे नवरदेवाला प्रथम हार घालण्याची परंपरा सुरू झाली.
हार घालण्यासाठी वधूने पुढाकार घेणे हे शुभ आणि लग्नाच्या आनंदी सुरुवातीचे लक्षण मानले जाते. यामुळे येणारे वैवाहिक जीवन प्रेम, समजूतदारपणा आणि आनंदाने भरलेले असेल असे मानले जाते.
वरमालाचा अर्थ केवळ हार घालणे नसून तो स्वीकृती आणि आदराचे प्रतीक आहे. जेव्हा नवरी नवरदेवाला हार घालते तेव्हा ती त्याला मनापासून स्वीकारते, तसेच जीवनातील सर्व सुख-दुःखात त्याच्यासोबत राहण्याची प्रतिज्ञा करते. तसेच जेव्हा नवरदेव वधूला हार घालतो तेव्हा तो देखील मनापासून तिला स्वीकारतो आणि आयुष्यभर तिच्यासोबत राहण्याची प्रतिज्ञा करतो.
सध्याच्या काळात शाही विवाहसोहळे आयोजित केले जातात. मात्र यातील हार घालण्याचा समारंभ प्राचीन परंपरांची आठवण करून देतो. या विधीमध्ये नवरी पुढाकार घेते याचा अर्थ लग्नात स्त्रीची संमती सर्वोपरि मानली जाते असा आहे.