आता देवीचं मूळ रूप दिसणार, प्रत्यक्ष दर्शन कधी घेता येणार?

| Updated on: Sep 13, 2022 | 5:03 PM

उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः खान्देश भागातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला मोठी गर्दी असते.

आता देवीचं मूळ रूप दिसणार, प्रत्यक्ष दर्शन कधी घेता येणार?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी देवीचं (SaptshrungiDevi) लवकरच प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. नवरात्र उत्सवातील (Navratrotsav) पहिल्या माळेला भाविकांना दर्शन खुले होणार आहे. सप्तशृंगी देवीचे स्वयंभू मूर्तीचं मूळ रूप आता भाविकांना बघायला मिळणार आहे. जवळपास अकराशे किलो शेंदूराचे लेपण मूर्तीवर काढण्यात आले आहे. पावसाळ्यात ढगफूटी सदृश्य पाऊस (Heavyrain) झाल्याने गडावर मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी मूर्तीच्या जवळपासचा काही भाग कोसळल्याने दर्शन बंद करण्यात आले होते.

उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः खान्देश भागातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला मोठी गर्दी असते.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सप्तशृंगी देवीच्या दर्शनसाठी वणी गडावर यंदा जास्तीची गर्दी असण्याची दाट शक्यता आहे.

पावसाळ्यात ढगफुटी पाऊस झाल्याने गडावर मोठे नुकसान झाले होते, त्यावेळी देवीचे दर्शन बंद करण्यात आले होते.

मंदिर देखभालीसाठी आणि देवीच्या मूर्ती संवर्धनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यादरम्यान अनेक वर्षांपासून साचलेला शेंदूर लेपण काढण्यात आले आहे.

धार्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला आहे. त्यानंतर सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान धार्मिक पूजा करण्यात आली आहे.

पितृपक्षात अथर्वशीर्ष पठण आणि अनुष्ठान होणार आहे. आणि त्यानंतर घटस्थापनेला देवीच्या मूळ रूपाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले होईल.

घटस्थापनेला सप्तशृंगी मातेच्या मूळ रूपाचं दर्शन भाविकांना घेता येईल. त्यासाठी भाविकांनी संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सप्तश्रुंगीचे नवे रूप –

मूर्तीवरील शेंदुर लेपन काढल्यानंतर दहा फुटी उंच आणि आठ फूट रुंद आकार झाला आहे. दोन्ही बाजूला नऊ आणि नऊ असे एकूण अठरा हात आहे. प्रत्येक हातात वेगवेगळे अस्र आणि शस्त्र आहेत. त्यामध्ये अक्षरमाला, कमल, बाण, खडक, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशु, कमांडलू, पानपात्र, धनुष्य, चर्म, कालदंड, शक्ती, पाच घंटा आहेत. श्री भगवतीची मूर्ती अति प्राचीन आणि एकमेव स्वयंभू मूर्ती असल्याचे सांगितले जाते.