Vastu Tips: सूर्यास्तानंतर ‘या’ गोष्टी कधीच करु नका, वास्तुशास्त्रानुसार अशुभ, जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
Vastu Tips: हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. त्यानुसारच अनेक गोष्टी ठरतात असतात. वास्तूशास्त्रात सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करु नये याबद्दल देखील सांगितलं आहे, तर जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट...

Vastu Tips: हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट शास्त्रानुसार घडत असते. तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये घरात सुख, समृद्धी आणि भरभराट टिकवून ठेवण्यासाठी काही नियम आहेत. घरात ठेवलेल्या वस्तूंपासून ते त्या खरेदी करण्याच्या आणि वापरण्याच्या वेळेपर्यंत…. सर्व गोष्टी वास्तूशास्त्रात सांगितल्या आहेत. एवढंच नाही या सर्वांचा व्यक्तीच्या आणि कुटुंबाच्या जीवनातील सुखावर परिणाम होतो. हे देखील सांगितलं आहे. याच कारणामुळे काही लोक वास्तु आणि ज्योतिषशास्त्राचे नियम लक्षात ठेवून आपली दैनंदिन कामे करतात. धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतरची वेळ खूप विशेष मानली जाते. या वेळेत काही कामं करणं आणि काही वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
सूर्यास्तानंतर काही विशेष वस्तू खरेदी करून घरी आणल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. यामुळे देवी लक्ष्मीच्या रोषाला सामोरं जावं लागतं…असं देखील म्हणतात, तर जाणून घ्या अशा कोणत्या 5 वस्तू आहेत, ज्या सूर्यास्तानंतर खरेदी करणं टाळावं. शिवाय कोणती कामं करु नये याबद्दल देखील सांगितलं आहे.
सूर्यास्तानंतर काय खरेदी करू नये?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लोखंड हा शनिदेवाचा धातू मानला जातो. लोखंड खरेदी करून सूर्यास्तानंतर घरी आणल्यास समस्या आणि शनिदोष वाढू शकतात. संध्याकाळी ग्लास तेल किंवा मोहरीचे तेल खरेदी केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समस्या येऊ शकतात.
सूर्यास्तानंतर सुया, कात्री, चाकू किंवा इतर कोणतीही धातूची अवजारे खरेदी करू नयेत, कारण यामुळे कौटुंबिक कलह आणि मानसिक ताण वाढू शकतो. झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. रात्रीच्या वेळी झाडू विकत घेतल्यास देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. तसेच त्यामुळे आर्थिक अडचणही येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर दूध, काळे किंवा चामड्याचे बूट घरी आणणे अशुभ मानले जाते.
सूर्यास्तानंतर काय करू नये?
सूर्यास्तानंतर कचरा बाहेर काढणे किंवा घराबाहेर टाकणे अशुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होऊन घर सोडून जाते, असा समज आहे. संध्याकाळी तुळशीच्या रोपाला स्पर्श करण्यास किंवा त्याची पाने तोडण्यास मनाई आहे. ही तुळस माता विश्रांती घेत असते. सूर्यास्तानंतर दूध, दही, मीठ, साखर, हळद किंवा पैशांची देवाणघेवाण करू नये. संध्याकाळ किंवा सूर्यास्तानंतर कपडे धुवू नयेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)