
हिंदू धर्मात पूजाला विशेष महत्त्व असते. कारण पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचे वातावरण निर्माण होते. पूजा केल्याने मनाला शांती मिळते. अनेकांच्या पूजा करण्याच्या पद्धती नक्कीच वेगवेगळ्या असतात. काहींचे विधी वेगळे असतील. पण जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा काही गोष्टींचे पालन करणेही गरजेचे असते. अन्यथा ती पूजा करणे व्यर्थ आहे. पूजा करताना कायम या 6 गोष्टी विसरू नये. अन्यथा केलेली पूजा कधीही फळ देणार नाही. त्या कोणत्या 6 वस्तू आहेत जाणून घेऊयात.
या वस्तू कायम लक्षात ठेवा.
स्वच्छता राखा
पूजास्थळ स्वच्छ आणि नीटनेटके असले पाहिजे. शुद्धता आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शिवाय, घाणेरडे कपडे घालून किंवा आंघोळ न करता पूजा करू नये. शास्त्रांनुसार, हे योग्य नाही.
लक्ष विचलित करणे टाळा
पूजेच्या वेळी मोबाईल फोन किंवा इतर गोष्टींमुळे पूजेवरील तुमचे लक्ष विचलित करणे टाळा. पूजेच्या वेळी तुमचे मन देवावर केंद्रित असणे महत्वाचे आहे, म्हणून कोणत्याही विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा.
फक्त शुद्ध फळे आणि फुले वापरा
पूजेदरम्यान फक्त स्वच्छ, ताजी फुले आणि शुद्ध फळे अर्पण करा. देवाला शिळी फुले किंवा कुजलेली फळे अर्पण करू नका. असे करणे शुभ मानले जात नाही.
मंत्रांचा उच्चार योग्यरित्या करा
पूजा करताना तुम्ही कोणता जाप किंवा मंत्र म्हणत असाल तर मंत्रांचा उच्चार योग्यरित्या करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्हाला मंत्र माहित नसेल, तर फक्त “ओम” किंवा भावनेने आणि भक्तीने देवाचे नाव घेणे पुरेसे आहे.
उजव्या बाजूला दिवे आणि अगरबत्ती लावा
ऊर्जा संतुलन आणि शुद्धता राखण्यासाठी, असे मानले जाते की देवाजवळ आणि दारात दिवा नक्की लावावा. तूपाचा दिवा असेल तर अजून उत्तम अन्यथा तेलाचा दिवाही लावू शकता. तसेच देवस्थानी अगरबत्ती, धूपही नेहमी लावावा पण दिवा आणि धूप हा पूजास्थळाच्या उजव्या बाजूला ठेवावे.
पूजा नंतर हे करा
पूजा पूर्ण झाल्यानंतर, प्रामाणिक अंतःकरणाने देवाची प्रार्थना करावी.नैवेद्य किंवा प्रसाद दाखवावा नंतर, तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्या सभोवतालच्या लोकांना हा प्रसाद वाटावा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)