AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ

सोने किंवा चांदी खरेदी करणे हे अनेकदा शुभ मानले जाते, पण तुम्हाला माहित आहे का की धर्मग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या काही वस्तू सोन्याप्रमाणेच शुभ परिणाम देतात. जर तुम्हाला यावर्षी अक्षय तृतीयेला सोने किंवा चांदी खरेदी करता येत नसेल तर या वस्तू खरेदी करणे देखील शुभ असते. चला जाणून घेऊयात या वस्तूंबद्दल...

अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर 'या' वस्तू खरेदी करणेही शुभ
अक्षय तृतीया हा एक शुभ दिवस मानला जातो Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 07, 2026 | 11:02 AM
Share

सनातन धर्मात अक्षय तृतीयेचा सण अत्यंत विशेष मानला जातो. हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. अक्षय तृतीया हा सण सौभाग्य आणि यशाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लक्ष्मी मातेची विशेष पूजा केली जाते. अक्षय तृतीया हा एक शुभ दिवस मानला जातो. याचा अर्थ असा की या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नसते.

अक्षय तृतीया म्हंटल की या दिवशी सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. या दिवशी केलेली खरेदी आणि गुंतवणूक कधीही तोट्याची ठरत नाही. सोने किंवा चांदी खरेदी करणे हे अनेकदा शुभ मानले जाते पण तुम्हाला माहित आहे का की धर्मग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या काही वस्तू सोन्याइतकेच शुभ परिणाम देतात. जर तुम्हाला यावर्षी अक्षय तृतीयेला सोने किंवा चांदी खरेदी करणे परवडत नसेल, तर या वस्तू खरेदी करण्याचा विचार करा. चला तर मग आजच्या लेखात अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊयात.

अक्षय्य तृतीयेला या वस्तू खरेदी करा

पिवळ्या कवड्या: अक्षय तृतीयेला 5 किंवा 11 पिवळ्या कवड्या खरेदी करा. धर्मग्रंथांमध्ये कवड्यांना लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते. अक्षय तृतीयेला केशर आणि हळदीने कवड्यांची पूजा करा आणि त्यांना आपल्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.

मातीचे भांडे: अक्षय तृतीयेला मातीचे भांडे खरेदी करा. या दिवशी मातीचे भांडे खरेदी करून घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. माती हे मंगळ आणि बुध ग्रहांचे प्रतीक मानले जाते. एक नवीन भांडे खरेदी करा ते पाण्याने भरा आणि त्याचे दान करा.

चणे, डाळ आणि तांदूळ: जर तुम्हाला अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करता येत नसेल, तर घरी चणे आणि अख्खे तांदूळ आणा. असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील.

पेन आणि डायरी: अक्षय तृतीयेला नवीन पेन आणि डायरी खरेदी करा. ते तुमच्या कार्यालयात किंवा तुम्ही जिथे काम करता तिथे ठेवा. असे केल्याने बुध ग्रह बलवान होतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा मार्ग
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
Moshi Building Collapsed | मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'मातोश्री'बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलता
'मातोश्री' बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलताना नेत्याचा मोठा खुलासा!
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना...
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना... FDA ची धडक कारवाई
2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
Girija Raut | 2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांचं उत्तर
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांची प्रतिक्रिया तुफान चर्चेत
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
मोठी बातमी! अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं सांगितली लग्नानंतरची प्रत्येक घटना
विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर....
Vinayak Raut | विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा हादरवणारा दावा; थेट....