Padharpur wari 2022: अंकली शितोळे सरकारांचे अश्व आज पुण्यात होणार दाखल

| Updated on: Jun 19, 2022 | 9:10 AM

पुणे, संत ज्ञानेश्वर महाराजांचे अश्व असणाऱ्या अंकली शितोळे सरकारांचे (Shitole sarkar) अश्व आज पुण्यात दाखल होणार असून पुण्यात आल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Shrimant Dagdusheth Halwai) गणपतीला मानवंदना देणार आहे. मानवंदना देण्यासाठी हे अश्व थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करेल. तब्बल  300 किलोमीटरचा प्रवास करून हे अश्व आळंदी (Alandi) येथे दाखल होईल.  189 वर्षांपासून अंकली येथील अंकलीकर […]

Padharpur wari 2022: अंकली शितोळे सरकारांचे अश्व आज पुण्यात होणार दाखल
Follow us on

पुणे, संत ज्ञानेश्वर महाराजांचे अश्व असणाऱ्या अंकली शितोळे सरकारांचे (Shitole sarkar) अश्व आज पुण्यात दाखल होणार असून पुण्यात आल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Shrimant Dagdusheth Halwai) गणपतीला मानवंदना देणार आहे. मानवंदना देण्यासाठी हे अश्व थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करेल. तब्बल  300 किलोमीटरचा प्रवास करून हे अश्व आळंदी (Alandi) येथे दाखल होईल.  189 वर्षांपासून अंकली येथील अंकलीकर सरकारांच्याकडून माऊलीचा मानाचा अश्व श्री आळंदीकडे पाठवण्याची परंपरा आहे. 10 जून रोजी उर्जित सिंह राजे शितोळे आणि कुमार महादजी राजे शितोळे यांच्या हस्ते राजवाड्यात विधिवत पूजन करून आरती करण्यात आली होती. त्यानंतर माऊलीच्या अश्वाचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजन झाल्यानंतर माऊलींच्या अश्वाने अंकलि येथील राजवाड्यातून तून प्रस्थान केले. अंकली गावात मानाचा अश्व जाण्याच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी सडा घालून आरती करण्यात आली. मानाच्या अश्वांसोबत असणाऱ्या वारकऱ्यांनी माऊलीचा गजर करत फुगडी खेळली. माऊलींचा मानाचा अश्व श्री क्षेत्र आळंदी येथे आज पोचणार आहे. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीत मोठा खंड पडला होता. मात्र आता कोरोना आवाक्यात आला असून शासनाने सर्व निर्बंध हटवले आहेत. यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातवरण आहे.