वयाच्या चौथ्या वर्षी दीक्षा, एक शताब्दीपासून कुंभ मेळ्यात आगमन, 128 वर्षीय पद्मश्री बाबा आहेत तरी कोण?

Padmshree Baba: स्वामी शिवानंद यांनी वयाच्या चौथ्या वर्षी स्वामी ओंकारानंद गोस्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे आई-वडील आणि बहिणीचे निधन झाले. त्यानंतर गुरुंच्या सहवासात राहून त्यांनी अध्ययन केले. त्यांनी आपले जीवन योग आणि मानव सेवेसाठी समर्पण केले आहे.

वयाच्या चौथ्या वर्षी दीक्षा, एक शताब्दीपासून कुंभ मेळ्यात आगमन, 128 वर्षीय पद्मश्री बाबा आहेत तरी कोण?
Padmshree Baba
| Updated on: Jan 18, 2025 | 5:47 PM

Mahakumbh 2025 Padmshree Baba News: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 11 जानेवारीपासून महाकुंभ सुरु झाला आहे. या महाकुंभात सहभागी होण्यासाठी देशविदेशातून भाविक आणि संत आले आहेत. या महाकुंभात एकापेक्षा एक सिद्ध, तपस्वी, ध्यानी आणि ज्ञानी संत-महंत आले आहेत. त्यामध्ये एक संन्यासी आहेत स्वामी शिवानंद. महाकुंभात आलेले ते सर्वात वयोवृद्ध संत आहेत. त्याचे वय 128 वर्ष आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

8 ऑगस्ट 1896 रोजी स्वामी शिवानंद यांचा जन्म झाला. त्यांचे आश्रम काशीमधील कबीर नगरीत आहे. ते मागील शंभर वर्षांपासून कुंभमेळ्यात येत आहे. त्यांनी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक मेळ्यात नियमितपणे सहभाग घेतला आहे.

असा आहे दिनक्रम

स्वामी शिवानंद यांची दिनचर्या सकाळी 3:00 वाजता सुरु होते. नित्य क्रिया आणि स्नान केल्यानंतर दोन ते तीन तास ते जप-तप आणि पूजा-पाठ करतात. त्यानंतर एक तास योगासन करतात. त्यानंतर ते लोकांना भेटण्यास सुरुवात करतात. स्वामी शिवानंद बाहेरचे काहीच खात नाही. ते मीठ, तेल, साखर, दूध आणि फळही घेत नाही. ते फक्त शिजवलेल्या भाज्या, वरण-भात, चपातीचे सेवन करतात. ते ज्या ठिकाणी जातात, त्यांच्याबरोबर त्यांचा स्वयंपाकी सोबत असतो.

वयाच्या चौथ्या वर्षी घेतली दीक्षा

स्वामी शिवानंद यांनी वयाच्या चौथ्या वर्षी स्वामी ओंकारानंद गोस्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे आई-वडील आणि बहिणीचे निधन झाले. त्यानंतर गुरुंच्या सहवासात राहून त्यांनी अध्ययन केले. त्यांनी आपले जीवन योग आणि मानव सेवेसाठी समर्पण केले आहे. त्यांनी अमेरिका, ग्रेट ब्रिटेन, जर्मनी, फ्रॉन्स, जपानसह 40 पेक्षा जास्त देशांची यात्रा केली. आज ते 128 वर्षांचे आहे, त्यावरुन त्यांचा फिटनेसचा अंदाज येतो.

21 मार्च 2022 रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी स्वामी शिवानंद 125 वर्षांचे होते. संगम लोअर रोडवरील किन्नर आखाड्यापासून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला स्वामी शिवानंदांचा तळ आहे.