AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पितृपक्षात ‘या’ जीवांचे आगमन मानले जाते खास, मिळतो पितरांचा आशीर्वाद!

पितृपक्षात घराच्या दारात काही प्राणी किंवा पक्षी दिसणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या काळात पूर्वज विविध जीवांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांना संकेत देतात, अशी श्रद्धा आहे.

पितृपक्षात ‘या’ जीवांचे आगमन मानले जाते खास, मिळतो पितरांचा आशीर्वाद!
Pitru paksha 2026Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Sep 30, 2026 | 4:31 PM
Share

पितृपक्ष हा पूर्वजांचे स्मरण, तर्पण आणि श्राद्ध करण्यासाठी महत्त्वाचा काळ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार, यंदा पितृपक्षाला २६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून १० ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला त्याची सांगता होणार आहे. या काळात पूर्वज आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद देण्यासाठी विविध माध्यमातून येतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. गरुड पुराण आणि धार्मिक मान्यतांनुसार, काही प्राणी-पक्ष्यांचे आगमन हे पितरांच्या प्रसन्नतेचे संकेत मानले जाते. त्यामुळे पितृपक्षात घराच्या आसपास हे काही प्राणी, पक्षी, जीव दिसले तर त्यांना हाकलू नये. उलट त्यांना अन्न किंवा पाणी देणे शुभ मानले जाते. या जीवांना अन्न देण्यामागे पूर्वजांप्रती श्रद्धा आणि सर्व जीवांबद्दल करुणा व्यक्त करण्याची भावना असल्याचेही मानले जाते. जाणून घेऊया, या जीवांशी संबंधित कोणत्या धार्मिक मान्यता प्रचलित आहेत.

कावळा

पितृपक्षात कावळ्याला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, कावळा हा पितरांचा प्रतिनिधी किंवा संदेशवाहक मानला जातो. घराच्या छतावर किंवा बाल्कनीत कावळा येऊन ठेवलेले अन्न खात असेल, तर ते पितरांच्या प्रसन्नतेचे संकेत मानले जाते.

काळ्या मुंग्या

घराच्या अंगणात किंवा स्वयंपाकघराच्या परिसरात काळ्या मुंग्या दिसणेही शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, पितृपक्षात त्यांना साखर किंवा पीठ अर्पण केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे मुंग्यांना हानी न पोहोचवता त्यांच्यासाठी अन्न ठेवण्याची प्रथा आहे.

काळा कुत्रा

काळ्या कुत्र्याचा संबंध धार्मिक परंपरेत भगवान भैरव आणि यमाशी जोडला जातो. पितृपक्षात काळा कुत्रा घराच्या दारात आल्यास त्याला अन्न देणे शुभ मानले जाते. अशा प्रकारे अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे.

गाय

हिंदू धर्मात गायीला अंत्यत पवित्र स्थान आहे. श्राद्धाच्या वेळी ‘गोग्रास’ काढण्याची परंपरा आहे. पितृपक्षात गाय घराच्या दारात आल्यास तिला अन्न देणे शुभ मानले जाते. श्राद्धासाठी तयार केलेले अन्न किंवा पहिली पोळी गाईला खाऊ घातल्याने घरात उत्तम आरोग्य, वंशवृद्धी आणि अखंड वैवाहिक सुख लाभते.

चिमणी किंवा इतर पक्षी

चिमणी घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा तुळशीजवळ येऊन दाणे खात असेल, तर तेही शुभ मानले जाते. घरात पक्ष्याने घरटे बांधणे हे पितरांच्या तृप्तीचे प्रतीक असल्याची धार्मिक मान्यता आहे.

काय करावे?

पितृपक्षात घराच्या परिसरात येणाऱ्या पशू-पक्ष्यांना हाकलून न देता शक्य असल्यास अन्न-पाणी द्यावे. श्राद्धाच्या दिवशी पंचबलीअंतर्गत देव, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठी अन्नाचा काही भाग वेगळा काढण्याची परंपरा आहे.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...