AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर लावा ही छोटीशी वस्तू, आयुष्यात कधी घराला कोणाची नजर लागणार नाही

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. अनेकदा आपल्या कुटुंबात सर्व काही सुरळीत सुरू असतं परंतु त्यानंतर घराला कोणाची तरी नजर लागते आणि अडचणी येण्यास सुरुवात होते. यावर वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत.

मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर लावा ही छोटीशी वस्तू, आयुष्यात कधी घराला कोणाची नजर लागणार नाही
HorseshoeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 8:18 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असवी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर अनेकदा तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो, जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो, तेव्हा तुमच्या घरातील सकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि ऊर्जा संतुलन बिघडते. जेव्हा एखाद्या घराचं ऊर्जा संतुलन बिघडतं, तेव्हा त्या घरावर अचानक संकटांची मालिका सुरू होते. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येते. किंवा कुटुंब प्रमुखाचे वारंवार घरातील इतर सदस्यांसोबत भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. यावर देखील वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

वास्तुशास्त्रामध्ये नजर लागणे ही एक संकल्प आहे. आपलं सगळं सुरळीत सुरू असतं परंतु काही लोकांना आपलं चांगलं झालं आहे, हे पहावंत नाही. ते सतत आपल्याबद्दल त्यांच्या मनात वाईट चिंतीत असतात, त्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम संबंधित घरावर आणि त्या घरातील राहणाऱ्या लोकांवर पडतो, विविध समस्या निर्माण होतात. यालाच नजर लागणे असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीची नजर लागू नये, यासाठी वस्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रामध्ये घोड्याच्या नालेला मोठं महत्त्व आहे. घोड्याची नाल म्हणजे घोड्यांच्या तळव्यांना पळताना काही दुखापत होऊ नये, म्हणून एक लोखंडी पट्टी ठोकलेली असते. जेव्हा ती खराब होते, तेव्हा ती काढून टाकली जाते आणि त्याच्या जागी अर्धवर्तुळाकार नवी लोखंडाची पट्टी ठोकली जाते. तिलाच नाल असं म्हटलं जातं. घोड्याच्या पायाची काढलेली जुनी नाल जर तुमच्या घराच्या मुख्य उंबऱ्यावर ठोकली तर तुमचं सर्व प्रकारच्या वाईट नजरपासून संरक्षण होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत