Raksha Bandhan 2022: कधी आहे यंदाचे रक्षा बंधन? भावासाठी चुकूनही खरेदी करू नये अशी राखी

| Updated on: Jul 11, 2022 | 11:52 AM

रक्षाबंधन (Raksha Bandhan 2022) हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यावर्षी रक्षाबंधन (raksha bandhan 2022 muhurat) हा सण गुरुवार, 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी, बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर शुभ मुहूर्तावर रक्षणासाठी धागा बांधतात, हा धागा […]

Raksha Bandhan 2022: कधी आहे यंदाचे रक्षा बंधन? भावासाठी चुकूनही खरेदी करू नये अशी राखी
Follow us on

रक्षाबंधन (Raksha Bandhan 2022) हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यावर्षी रक्षाबंधन (raksha bandhan 2022 muhurat) हा सण गुरुवार, 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी, बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर शुभ मुहूर्तावर रक्षणासाठी धागा बांधतात, हा धागा दुष्ट शक्तीपासून भावाचे रक्षण करतो आणि  त्याच वेळी, भाऊ त्यांच्या बहिणींना त्यांचे संरक्षण करण्याचे वचन देतो. महाराष्ट्रात या सणाला राखी असेही म्हणतात. भाऊ बहिणींच्या नात्याचा हा सर्वात मोठा हिंदू सण आहे. चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधनाला यावेळी कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधली जाईल, भद्रकालची वेळ कोणती असेल आणि या दिवशी बहिणींनी कोणत्या प्रकारची राखी बांधू नये.

रक्षाबंधन शुभ मुहूर्त २०२२

या वर्षी पौर्णिमा 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होईल आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.05 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत बहिणी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8.51 ते रात्री 9.19 या वेळेत राखी बांधू शकतात.

हे सुद्धा वाचा

रक्षाबंधन भाद्र कालच्या वेळा (Rakshabandhan Muhurat 2022)

रक्षाबंधन भाद्र समाप्ती वेळ – रात्री 08:51 वाजता
रक्षा बंधन भाद्र पूंछ – संध्याकाळी 05.17 ते 06.18 पर्यंत
रक्षाबंधन भाद्र मुख – संध्याकाळी 06.18 ते 08.00 वाजता

रक्षाबंधनाला चुकूनही अशी राखी खरेदी करू नका

रक्षाबंधनाच्या अनेक दिवस आधीपासून बाजारात राख्यांची विक्री सुरू होते. या वेळी बाजारात विविध प्रकारच्या राख्यांची विक्री होते.  तुम्हीही तुमच्या भावांसाठी राखी खरेदी करणार असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. तुम्ही तुमच्या भावाला अशा राख्या बांधू नका की त्याच्या दीर्घायुष्याऐवजी त्याच्यावर संकट येईल.

राखी घेताना प्रत्येक बहिणीला वाटते की, तिने आपल्या भावासाठी अशी राखी घ्यावी जी खूप सुंदर असेल आणि राखी पाहून भावाला आनंद होईल, पण तुम्हाला माहित आहे का? की, राखीचे काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात.

राखी घेताना लक्षात ठेवा की मोठ्या आकाराची राखी घेणे टाळा. आकाराने मोठी असल्याने ही राखी सहज तुटू शकते ज्यामुळे तुमच्या भावाला आयुष्यात अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. याचा तुमच्या दोघांच्या नात्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

राखी घेताना राखीमध्ये काळा रंग नसावा हेही लक्षात ठेवा. काळा रंग हा सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्हींचे प्रतीक मानला जातो, परंतु पूजा साहित्यात काळा रंग वापरण्यास मनाई आहे. अशा वेळी ज्या राख्या काळ्या रंगाच्या असतात त्या शुभ मानल्या जात नाहीत. त्यामुळे राखीमध्ये काळा रंग नसावा.

तुम्ही तुमच्या भावासाठी लहान आकाराची चांदीची राखी घेऊ शकता. यासोबत तुम्ही अशी राखी देखील घेऊ शकता ज्यामध्ये ओम किंवा स्वस्तिकचे प्रतीक बनलेले असेल.

जर तुमच्या घरात जुनी राखी पडली असेल तर ती अशा प्रकारे फेकण्याची चूक करू नका, असे करणे राखीचा अपमान मानले जाते. अशा राख्या  वाहत्या नदीत किंवा तलावात विसर्जित कराव्या.