Horoscope 5 May 2022: नवं काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ, अचानक खर्च वाढेल

शेअर, सट्टा यासारख्या कामापासून दूर राहा. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

Horoscope 5 May 2022: नवं काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ, अचानक खर्च वाढेल
नोकरदार लोकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडेल.
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 6:15 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेच्या आधारे निश्चित केली जाते. ज्योतिषशास्त्रा (Astrology)त 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. या आधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्यद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घ्या.

मकर –

आजचा दिवस तुमच्यासाठी सफलता देणारा आहे. त्यामुळे सकारात्मक रित्या आपल्या कामाला लागा. रखडलेली कामं होतील. घरगुती वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवता येतील.
कोणाकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. आपल्या कामात क्षमतेवर आणि योग्यतेवर विश्वास ठेवा. शेअर, सट्टा यासारख्या कामापासून दूर राहा. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. निरोपयोगी कामात वेळ वाया घालवू नका.
कामाच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तिशी बोलताना संयमाने बोला. राग आणि घाईत परिस्थिती बिघडू शकते. कोणतंही नवं काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.

लव फोकस – नवरा बायको मध्ये कैटुंबिक वाद होतील. घरात कोणाचे तरी लग्न ठरू शकते.
खबरदारी – कामाचा जास्त लोढ स्वत: वर घेवू नका. गर्भाशय आणि खांदेदुखीची समस्या वाढू शकते.
शुभ रंग – भगवा
भाग्यवान अक्षर –
अनुकूल क्रमांक – 7

कुंभ –

कुंटूबात मोठ्याचे आशीर्वाद, स्नेह राहिल. बऱ्याच काळापासून जे काम करत असाल त्यात अप्रत्यक्षपणे लाभ मिळणार आहे. घरात धार्मिक कार्य संपन्न होऊ शकते.
शेजाऱ्यांशी मतभेद होवू शकतात. लोकांच्या कामात पडू नका. अचानक खर्च वाढू शकतो. अधिक लोकांशी संबंध तसंच मीडिया संबंधित कामात जास्त वेळ व्यतित करा. त्याने तुम्हाला नवी माहिती मिळेल. त्याने फायदे देखील होईल. ऑफिस मध्ये अधिकाऱ्यांसोबत सहज व्यवहार ठेवा.

लव फोकस – वैवाहिक संबंध चांगले राहतील. घरातील सर्व सदस्य चांगले वागतील.
खबरदारी – आरोग्य चांगले राहिल.
शुभ रंग – हिरवा
भाग्यवान अक्षर –
अनुकूल क्रमांक – 5

मीन –

अनुभवी आणि धार्मिक व्यक्तीच्या भेटीमुळे तुमच्या विचारात सकारात्मक बदल होईल. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित प्रयत्नांचे उत्कृष्ट परिणाम मिळतील.स्थावर मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत आज पैशाशी संबंधित व्यवहार पुढे ढकलून ठेवा. आज तुमच्याकडून काही चूक होऊ शकते, ज्यामुळे नात्यात दुरावा येईल. कोणतीही नवीन योजना करू नका वेळ योग्य नाही. पार्टनरशीप संबंधित व्यवसायात भूतकाळातील नकारात्मक गोष्टी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात तसं होवू देऊ नका. नोकरदार लोकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडेल.

लव फोकस – पती-पत्नीमध्ये लहानसहान गोष्टीवरून दुरावा निर्माण होऊ शकतो. एकमेकांवर विश्वासाची भावना ठेवा.
खबरदारी – रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. तणाव आणि नकारात्मक गोष्टीपासून दूर रहा.
शुभ रंग – क्रीम
भाग्यवान अक्षर –
अनुकूल क्रमांक – 3