या दिवशी पाळला जाईल जून महिन्यातील पहिला प्रदोष व्रत, जाणून घ्या वेळ आणि तारीख
पंचांगानुसार प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याला दोनदा येते. एकदा कृष्ण पक्षात आणि दुसरं शुक्ल पक्षात. हे प्रदोष व्रत महादेवाला समर्पित मानले जाते. त्यामुळे जून महिन्याचा पहिला प्रदोष व्रत कोणत्या दिवशी पाळला जाईल, शुभ वेळ कोणती आहे ते जाणून घेऊयात.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. या दिवशी भगवान महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही जर भक्ती भावाने प्रदोष व्रताच्या दिवशी योग्य विधींनी भगवान शिवाची पूजा केल्याने तुम्हाला सुख-शांती लाभते आणि समस्या दूर होतात. जून महिना सुरू झाला आहे. तर या महिन्यातील पहिले प्रदोष व्रत केव्हा पाळले जाईल. चला तर मग नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत आजच्या लेखात जाणून घेऊयात.
जून महिन्यात पहिला प्रदोष उपवास कधी आहे?
वैदिक पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 12 जून रोजी सायंकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी सुरू होते. ते 13 जून रोजी सायंकाळी 4 वाजून 07 मिनिटांनी संपेल. परिणामी जून महिन्यातील पहिला प्रदोष उपवास 12 जून रोजी पाळला जाईल. हा उपवास शुक्रवारी येत असल्यामुळे त्याला शुक्र प्रदोष उपवास म्हणून संबोधले जाते.
पूजेसाठी शुभ वेळ
प्रदोष काळात प्रदोष व्रताची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे, 12 जून रोजी प्रदोष काळ सायंकाळी 7 वाजून 36 मिनिट ते रात्री 9 वाजून 20 मिनिटांपर्यंत असेल. या काळात सर्व भक्त भगवान शिवाची पूजा करू शकतात.
पूजा करण्याची पद्धत
प्रदोष उपवासाच्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करावी आणि त्यानंतर दिवसभर फळे खावीत किंवा उपवास ठेवावा.
संध्याकाळी तुम्ही शिवमंदिरात जावे किंवा तुमच्या घरात शिवलिंग असल्यास त्यावर अभिषेक करावा.
भगवान शिवाला पाणी, दूध, मध, गंगाजल, बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करा.
यानंतर शिव चालिसा, महामृत्युंजय मंत्र किंवा प्रदोष व्रत कथा पाठ करा.
शुक्र प्रदोष व्रताचे महत्त्व
हिंदू मान्यतेनुसार शुक्रवारी योग्य विधींसह शुक्र प्रदोष व्रत पाळल्याने भक्ताला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो आणि सुख-शांतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. शिवाय शुक्र प्रदोष व्रताच्या पुण्यकारक प्रभावांमुळे व्यक्तीची संपत्ती आणि समृद्धी टिकून राहते, ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
