AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीला असे मानले जाते की या एकादशीचा उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोठे पुण्य प्राप्त होते. चला तर मग वरुथिनी एकादशी केव्हा आहे तसेच, पूजेची शुभ वेळ आणि पद्धतही जाणून घेऊयात.

'या' दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 1:58 PM
Share

हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला समर्पित करून उपवास केला जातो. वर्षभरात 24 एकादशीचे उपवास असतात. प्रत्येक एकादशीच्या उपवासाचे स्वतःचे महत्त्व आणि फायदे देखील आहेत. हिंदी पंचांगानुसार वरुथिनी एकादशी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येते, जो एप्रिल महिन्यात येतो. उपवासासोबतच या दिवशी भगवान विष्णू यांची विशेष विधी आणि प्रार्थना देखील केल्या जातात.

हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार वरुथिनी एकादशीचे व्रत पाळल्याने आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने हजारो वर्षांच्या तपश्चर्येइतके फळ मिळते. असे मानले जाते की हे व्रत मनोभावे केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोठे पुण्य प्राप्त होते. शिवाय, भगवान विष्णूच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी नांदते. चला तर मग वरुथिनी एकादशी केव्हा आहे, तसेच तिची शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घेऊयात.

वरुथिनी एकादशी कधी असते?

द्रिक पंचांगानुसार यावर्षी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथी 13 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1 वाजून 17 मिनिटांनी सुरू होईल आणि 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1 वाजून 08 मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार, वरुथिनी एकादशीचा उपवास सोमवार 13 एप्रिल 2026 रोजी केला जाईल आणि त्याचे पारण 14 एप्रिल 2026 रोजी द्वादशी तिथीला केले जाईल.

वरुथिनी एकादशी पूजा मुहूर्त

वरुथिनी एकादशीच्या दिवशी पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 05 वाजून 58 ‍ मिनिटांपासून ते सकाळी 07 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल.

बाज पूजेसाठी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांपासून ते 10 वाजून 46 मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त असेल.

वरुथिनी एकादशी पूजा विधि

वरुथिनी एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा.

यानंतर घरातील देव्हारा स्वच्छ करून त्यावर गंगाजल शिंपडा.

यानंतर पाटावर पिवळ्या रंगाचे आसन ठेवा आणि भगवान विष्णूंचा फोटो त्यावर ठेवा.

आता विष्णूंच्या फोटो जवळ धूप आणि दिवा लावा. व देवाला नैवेद्य अर्पण करा.

मंत्रांचा जप करा आणि एकादशी व्रतेच्या कथेचे वाचन करा. शेवटी आरती करून पूजा समाप्त करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा