Vastu Shastra : मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही? मग करा हे तीन सोपे उपाय, वास्तुशास्त्र काय सांगतं?
आजच्या पालकांसमोर मुलांचं संगोपन कसं करावं? याबाबत अनेक आव्हानं आहेत. सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक मुलं सोशल मीडियाच्या आहारी गेलेले दिसून येतात. मुलांचं अभ्यासात लक्ष नसतं. मुलांनी अभ्यास करावा, त्यांना यश प्राप्ती व्हावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

आजच्या पालकांसमोर आपल्या मुलांसंदर्भात अनेक आव्हानं आहेत. त्यातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे आज जवळपास सर्वच पालकांची तक्रार असते की त्यांची मुलं अभ्यास करत नाहीत. अभ्यासामध्ये मुलांचं लक्ष लागतं नाही. त्याचा परिणाम हा मुलांच्या परीक्षेवर देखील होतो. अनेक मुलांच्या बाबतीमध्ये तर असं होतं की, ही मुलं प्रचंड हुशार असतात. स्मार्ट असतात. मात्र परीक्षेमध्ये त्यांना कमी मार्क मिळतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही मुलं वर्षभर अभ्यास करत नाहीत, त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलाचं अभ्यासात लक्ष न लागण्याची कारणं ही वेगवेगळी असू शकतात. पालक देखील आपल्या मुलांनी अभ्यास करावा यासाठी प्रयत्न करत असतात. जर विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
सरस्वती मंत्राचा जप – सरस्वती मातेला विद्येची देवता मानलं जातं. जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील तर तुम्ही सकाळी अंघोळीनंतर त्यांच्याकडून सरस्वती मंत्राचा जप करून घेऊ शकता, यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
गणपती अराधना – दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर गणपतीची प्रार्थना करावी, तसेच गणपतीला एक लाल फूल अर्पण करावे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
मुलांच्या अभ्यासाची रूम – वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासाची रूम हे नेहमी पूर्व दिशेला असावी असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. पूर्व दिशेला रूम असल्यामुळे या रूममध्ये सूर्याचा प्रकाश दीर्घकाळ आणि पुरेसा राहतो, त्यामुळे मुलांना आळस येत नाही, अभ्यास करताना झोप देखील येत नाही. त्यामुळे मुलाच्या अभ्यासाची रूम ही नेहमी पूर्व दिशेला असावी असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
