Vastu Shastra : प्रमोशन रखडलंय? कामाचा ताण जाणवतोय? मग लॅपटॉपच्या बाजूला चुकूनही ठेवू नका या गोष्टी

काहीजण आपल्या नोकरीच्या ठिकाणी प्रचंड कष्ट करतात, मेहनत करतात. परंतु तरी देखील त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. तसेच अनेकांना कामाचा ताण जाणवतो, या समस्या दूर करून करिअरमधील प्रगतीसाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : प्रमोशन रखडलंय? कामाचा ताण जाणवतोय? मग लॅपटॉपच्या बाजूला चुकूनही ठेवू नका या गोष्टी
Vastu Shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 16, 2026 | 8:31 PM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. अनेकदा दैनंदिन आयुष्यात आपण अशा काही गोष्टी करतो, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्याचे अनेक नकारात्मक परिणाम तुम्हाला पहायला मिळतात. जंस की अचानक काहीही कारण नसताना एखादं मोठं आर्थिक संकट येतं. किंवा तुम्ही प्रचंड कष्ट करतात, परंतु तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळत नाही? त्यामुळे वास्तुदोष दूर करणं गरजेचं असतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण त्यातील एका सोप्या आणि सहज शक्य असलेल्या एका उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. या उपायामुळे तुमची तुमच्या करिअरमध्ये उत्तम प्रगती होऊ शकते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

लॅपटॉपजवळ अनावश्य वस्तू ठेवू नका – वास्तुशास्त्रानुसार आपल्याला ऑफिसमध्ये अचानक एखाद्या दिवशी कामाचा ताण जाणवायला लागतो. कामाचा कंटाळा येते. नकारात्मक ऊर्जेमुळे अशा गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या लॅपटॉपजवळ अनावश्यक गोष्टी ठेवल्या तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडतो, त्यामुळे तुम्हाला कामाचा कंटाळा येतो. त्यामुळे लॅपटॉपजवळ कधीही अनावश्यक वस्तू ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

सुकलेली झाडं – वास्तुशास्त्रानुसार लॅपटॉपच्या जवळ कधीही सुकलेली झाडं ठेवू नयेत, तसेच गुलाब वगळता इतर कोणतंही काटे असलेलं झाडं देखील ठेवू नये, जर तुमच्या लॅपटॉप जवळ ठेवलेली झाडं ही सुकली असतील तर त्यांना ताबडतोब काढून टाकावं आणि त्याच्या जागी फ्रेश नवीन झाडं लावावीत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

धारदार वस्तू – वास्तुशास्त्रानुसार लॅपटॉपजवळ कधीही धारदार वस्तू जसं की चाकू, कात्री अशा वस्तू ठेवू नये, या वस्तू एखाद्या डब्यामध्ये लॅपटॉप पासून लांब ठेवाव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अशा वस्तू लॅपटपसमोर ठेवणं अशुभ माण्यात आलं आहे.

खाराब इलेक्ट्रॉनिक वस्तू – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या लॅपटॉपसमोर कधीही खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नका, यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us