Vastu Shastra : पाकिटात ठेवलेल्या या पाच वस्तू आयुष्य उद्ध्वस्त करतील, पैसा कधीच टिकणार नाही, वास्तुशास्त्र काय सांगतं?
आपल्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा अशुभ असा प्रभाव आपल्यावर पडतो. हातात पैसा टिकत नाही, घरात सतत वादविवाद होतात, अशा प्रकारच्या समस्या जाणवतात. यालाच वास्तुशास्त्राच्या भाषेत वास्तुदोष असं म्हणतात. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या घरात असलेल्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करते आणि ऊर्जा असंतुलन निर्माण होते. यालाच वास्तुदोष असं देखील म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्या घरातील कुटुंब प्रमुखाला तसेच त्या घरातील इतरही सदस्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जसं की काहीही कारण नसताना घरात सारखी भांडणं होत राहतात. हातात पैसा टिकत नाही, हे सर्व वास्तुदोषाचे परिणाम असतात. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण त्यातीलच एका उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या चुकूनही पाकिटात ठेवू नये, अशा गोष्टींमुळे तु्मच्या आर्थिक प्राप्तीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.
जुनी बिलं – वास्तुशास्त्रानुसार पाकिटामध्ये कधीही जुनी बिलं ठेवू नये. यामुळे तुमच्या आर्थिक प्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात. तुमच्या पाकिटामध्ये पैसा टिकत नाही, अचानक खर्चामध्ये मोठी वाढ होते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे कधीही तुमच्या पाकिटामध्ये जुनी बिलं ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अनेक लोकांना आपल्या पाकिटामध्ये जुनी बिलं ठेवण्याची सवय असते, मात्र ही सवय चुकीची आहे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
पूर्वजांचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार अनेक लोकांना आठवण म्हणून आपल्या मृत पूर्वजांचे फोटो आपल्या पाकिटात ठेवण्याची सवय असते. मात्र यामुळे पितृदोष निर्माण होतो. पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कधीही अशा प्रकारचे पूर्वजाचे फोटो हे पाकिटात ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. पूर्वजाचे फोटो हे केवळ घरातच आणि ते देखील दक्षिण दिशेकडे तोंड करूनच असावेत असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
फाटलेल्या नोटा – वास्तुशास्त्रानुसार पाकिटामध्ये फाटलेल्या नोटा ठेवणं हे अशुभ माण्यात येतं. यामुळे तुमच्या आर्थिक प्राप्तीच्या मार्गात अडथळा निर्माण होतो, तसेच खर्चामध्ये देखील वाढ होते. हातात पैसा टिकत नाही, त्यामुळे पाकिटात कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
