Vastu Shastra : अशा घरात कधीच टिकत नाही पैसा, वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या घराची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे असते, त्या घरात सुख, समृद्धी येते, घराची भरभराट होते. परंतु काहीवेळेस घराची रचना जरी वास्तुशास्त्राप्रमाणे असली तरी देखील घरात पैसा टिकत नाही.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. ज्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असते, त्या घराची भरभराट होते. अशा घरात सुख, शांती समृद्धी असते. मात्र काहीवेळेला आपल्याला असा देखील अनुभव येतो की घराची रचना तर वास्तुशास्त्राप्रमाणेच असते. परंतु तरी देखील घरात पैसा टिकत नाही. काहीही कारण नसताना घरातील सदस्यांचे सतत भांडणं होतात. घर अशांत होतं. तुम्ही विचार केला आहे का? असं कशामुळे होत असेल. वास्तुशास्त्रानुसार त्यामागे विविध कारण असू शकतात. आज आपण अशाच काही कारणांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सातत्याने अडचणी निर्माण होतात. घरात पैसा टिकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
घराची पश्चिम दिशा – वास्तुशास्त्रानुसार घराची पश्चि दिशा ही शनि देवाची दिशा असते. तुमच्या घराची रचना कितीही वास्तुशास्त्रानुसार असू द्या, परंतु जर तुमच्या घराच्या पश्चि दिशेला येणारा भाग हा अस्वच्छ असेल, तिथे अवजड वस्तू ठेवलेल्या असतील तर अशा घराला कधीही बरकत प्राप्त होत नाही. कुटुंब प्रमुखाच्या हातात कधीच पैसा टिकत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यामुळे घराची पश्चिम दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवावी, तसेच या बाजुला कोणंतही अवजड सामान ठेवू नये.
घराची उत्तर दिशा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची असते. त्यामुळे या दिशेला कधीही बंद पडलेलं खराब झालेलं इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक सामान ठेवू नये, तसेच घराच्या या दिशेला पेपरची रद्दी किंवा इतर कोणतंही टाकावू सामान ठेवू नये, यामुळे तुमच्या आर्थिक प्राप्तीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ असावी.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
