AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : या 5 ठिकाणी कधीच ठेवू नका पैसे, कायम आर्थिक चणचण जाणवेल, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात अशी पाच ठिकाणं असतात, जिथे कधीही पैसा ठेवला नाही पाहिजे. यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. घराला बरकत प्राप्त होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे त्याबद्दल.

Vastu Shastra : या 5 ठिकाणी कधीच ठेवू नका पैसे, कायम आर्थिक चणचण जाणवेल, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 7:15 PM
Share

काही जणांच्या बाबतमीमध्ये असं नेहमी होतं, ते प्रचंड कष्ट करतात, परंतु तरी देखील त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. महिन्याच्या शेवटी बँक अकाऊंट रिकाम असतं. या मागे त्या घरात निर्माण झालेला ऊर्जादोष देखील कारणीभूत असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात अशा पाच जागा असतात, जिथे चुकूनही पैसे ठेवले नाही पाहिजेत. कारण त्यामुळे तुमच्या अर्थप्राप्तीच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. चला तर मग ही पाच ठिकाणं नेमकी कोणती आहेत? आणि त्याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये काय सांगण्यात आलं आहे? याबद्दल जाणून घेऊयात. वास्तुशास्त्रानुसार यातील काही ठिकाणं तर अशी आहेत, ज्यांचा थेट सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेशी संबंध येतो, त्यामुळे तुमच्या आर्थिक प्राप्तीच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ शकतात.

स्वयंपाक घरातील डबे – अनेकांना विशेषत: महिलांना स्वयंपाक घरातील डब्यामध्ये पैसे ठेवण्याची सवय असते. मात्र वास्तुशास्त्रानुसार कधीही स्वयंपाक घरातील डब्यामध्ये पैसे ठेवू नये, कारण स्वयंपाक घर हे अग्नि तत्वाशी संबंधित असतं. त्यामुळे कधीही स्वयंपाक घरात पैसे, दागिने ठेवू नयेत.

घराच्या मुख्य दरवाजाच्या आसपास – वास्तुशास्त्रानुसार कधीही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ पैसे ठेवू नये. कारण तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा उर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. मात्र घराच्या मुख्य दवराजामधून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा प्रवेश करत असतात.

बेडखाली पैसे ठेवू नका – वास्तुशास्त्रानुसार पैसे किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू कधीही बेडच्या खाली ठेवू नये, कारण यामुळे ऊर्जा संतुलन बिघडतं. तसेच वारंवार तुमच्या झोपेमध्ये अडथळे येतात. त्यामुळे कधीही पैसे बेडीखाली ठेवू नयेत, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

जीन्याखालची जागा – वास्तुशास्त्रानुसार अनेक लोक हे आपल्या घरातील जीन्याखाली उरलेल्या जागेचा उपयोग कपाट बनवण्यासाठी करतात. परंतु अशा कपाटामध्ये कधीही पैसा ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. कारण या जागेवर सदैव भार असतो, ज्याचा नकारात्मक प्रभाव निर्माण होतो.

घराच्या ईशान्य कोपऱ्यात – वास्तुशास्त्रानुसार कधीही घराच्या ईशान्य कोपर्‍यात पैसे ठेवू नये, तसेच या कोपऱ्यात कधीही तुमची तिजोरी असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान