Vastu Shastra : बेडरूममध्ये कधीच ठेवू नका या चार वस्तू, अन्यथा पती-पत्नीच्या नात्यामध्ये येईल दुरावा
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत, ती प्रत्येक वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवावी आणि कोणत्या दिशेला ठेवावी? याच्या जागा निश्चित असतात. जर तुम्ही एखादी वस्तू चुकीच्या जागी ठेवली तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात, कोणत्या वस्तू नसाव्यात? तुमच्या घरात ज्या वस्तू आहेत, त्या कोणत्या स्थानी ठेवाव्यात तसेच त्यांची दिशा कोणती असावी याचे देखील काही नियम आहेत. जर या नियमांचं पालन नाही झालं. तुम्ही चुकीची वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवली तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास त्याचे वेगवेगळे अशुभ परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. जसं की घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. कायम आर्थिक अडचणी येतात. हातात पैसा टिकत नाही. त्यामुळे अशा समस्या टाळण्यासाठी वास्तु नियमांचं पालन केलं पाहिजे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू या बेडरूममध्ये असू नयेत, तसेच त्याचा काय परिणाम होऊ शकतो? याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.
देवी-देवतांचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार बेडरूमध्ये राधा-कृष्ण यांचा फोटो सोडला तर बाकी कोणत्याही देवी देवतांचे फोटो असू नयेत.कारण यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. देवी देवतांचे फोटो हे तुम्ही तुमच्या देवघरात किंवा हॉलमध्ये लावू शकतात. मात्र बेडरूममध्ये फोटो लावू नयेत.
आरसा – वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कधीही आरसा असू नये, कारण यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. बेडजवळ तर कधीच आरसा असू नये, असंही वास्तुशास्त्र सांगतं. बेडरूममध्ये असलेल्या आरशामुळे पती-पत्नीमधील दुरावा वाढतो, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे.
काटेरी वनस्पती – वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कधीही काटेरी वृक्ष, वनस्पती असू नयेत. कारण यामुळ पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. घरात सतत नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर होतो. त्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
अवजड सामान – वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कधीही अवजड किंवा जुने सामान ठेवू नये. बिघडलेल्या इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वस्तू , बंद पडलेलं घड्याळ असा वस्तू बेडरूमच काय परंतु संपूर्ण हॉलमध्ये देखील ठेवू नये, असा सल्लाही वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
