Vastu Shastra : मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतताना कधीच करू नका या चुका, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं आणि त्याची रचना कशी असावी या संदर्भातच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर अध्यात्म आणि धर्मशास्त्रामधील अनेक नियम आणि त्या नियमांचं पालन न केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याची देखील माहिती देण्यात आली आहे.

Vastu Shastra : मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतताना कधीच करू नका या चुका, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 07, 2025 | 8:03 PM

वास्तुशास्त्राला हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्र हे केवळ तुमच्या वास्तू अर्थात घराची रचना कशी असावी एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये, तर वेगवेगळे धार्मिक कार्य करताना काय काळजी घेतली पाहिजे? त्याची योग्य पद्धत कोणती? याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. जसं की आपण घरात किंवा देवापुढे दिवा लावतो, मात्र अनेकजण दिवा लावताना काही चुका करतात त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. दिवा कोणत्या दिशेला लावावा, दिवा कोणत्यावेळी लावावा? दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती? यासंदर्भात वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे अनेक जण देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात, परंतु मंदिरातून घरी परताना नकळत काही छोट्या-छोट्या चुका करतात, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घर अशांत बनतं. आज आपण मंदिरातून घरी येताना कोणत्या चुका करू नये याची माहिती घेणार आहोत.

मंदिरातून घरी परताना कोणत्या चुका करू नये?

तुम्ही जेव्हा मंदिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी जाता, तेव्हा तुम्हाला तिथे प्रसाद मिळतो. हा प्रसाद घरी आणून आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत खायचा असतो, असं करणं शुभ मानलं जातं. यामुळे तुम्हाला तर देवाचा आशीर्वाद मिळतोच, परंतु तुमच्यासोबतच सर्व कुटुंबाला देखील देवाचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे मंदिरात मिळालेला प्रसाद हा कधीही वाटेत खाऊ नये, तर तो घरी आणूनच खावा असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

नकारात्मक विचार टाळा – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा मंदिरातून घरी परतत असतात, तेव्हा तुमच्यासोबत एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते, अशावेळी तुम्ही जो विचार करत असतात, तशा गोष्टी तुमच्या सोबत घडण्याची अधिक शक्यता असते, त्यामुळे मंदिरातून घरी परताना किंवा देवाचं दर्शन घेतल्यानंतर कधीही नकारात्मक विचार करू नका.

लगेचच पाय धुवू नका – मंदिरामधून घरी परतल्यानंतर लगेचच पाय धुवू नका, असं करणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं गेलं आहे.

मंदिरातून थेट घरीच या – तुम्ही देवाच्या दर्शनासाठी मंदिरात गेला आहात, देवाचं दर्शन झाल्यानंतर इतर कुठेही न जाता थेट घरीच यावं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)