AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात सुख, समृद्धी अन् धन प्राप्तीसाठी मिठाचे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की, घरामध्ये सगळं सुरळीत सुरू असतं, परंतु अचानक परिस्थिती विपरीत बनते. एखादं मोठं आर्थिक संकट येतं, किंवा घरात सारखी भांडणं होऊ लागतात. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. घरात अशा घटना घडू नये, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : घरात सुख, समृद्धी अन् धन प्राप्तीसाठी मिठाचे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
VASTUSHTRA Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 9:39 PM
Share

अनेकांसोबत अशा काही घटना घडतात ज्यामुळे अचानक त्यांचं आयुष्य बदलून जातं. आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू असताना एखादं मोठं आर्थिक संकट येतं, या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग लवकर सापडत नाही. काही लोकांना असाही अनुभव येतो, की घरात काहीही कारण नसतं, परंतु दररोज भांडणं होतात. कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांसोबत पटत नाही. पती-पत्नीचे देखील अनेकदा वाद होतात. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? असं नेमकं का होत असेल? तर या मागे अनेक कारणं असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा सामान्यपणे अशा घटना घडतात. यालाच वास्तुशास्त्राच्या भाषेत वास्तुदोष असं म्हटलं जातं. तुमच्या सोबत देखील अशाच घटना घडत असतील, तर त्यासाठी वास्तुशासात्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मीठाच्या पाण्याने उंबरा पुसा – वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमचं सगळं सुरळीत सुरू असतं, तेव्हा काही लोकांना तुमची प्रगती पाहावत नाही, असे लोक कायम तुमच्याबद्दल वाईट विचार करतात. जेव्हा हे लोक तुमच्याबद्दल वाईट विचार करता, तेव्हा त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होत असतो. यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात यालाच आपण घराला कोणाची तरी नजर लागली असं म्हणतो. यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा हा दररोज सकाळी एकदा तरी सैंधव मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायचा, या उपायामुळे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुमच्या कुटुंबाचं संरक्षण होतं.

मीठाचं दान – जर तुमच्या हातता पैसा टिकत नसेल, घरात बरकत नसेल तर अशावेळी जिथे भंडारा आहे, अशा ठिकाणी मीठाचं दान करावं, या उपायामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. लक्ष्मी मातेच्या कृपेनं घराला बरकत प्राप्त होते. हातात पैसा टिकतो, घरात समृद्धी येते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

तुम्हाला जर रात्री चांगली झोप लागत नसेल सारखी वाईट स्वप्न पडत असतील तर त्यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे एका पुडीमध्ये चिमूटभर मीठ बांधा आणि ती पुडी रात्री झोपताना तुमच्या उशिखाली ठेवा, या उपायामुळे तुम्हाला शांत झोप तर लागेलच परंतु सर्व वाईट शक्तिंपासून तुमचं संरक्षण होईल, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?