AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : स्वप्नात सतत साप दिसत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय? काय उपाय करावेत?

अनेकदा आपल्याला झोपेत स्वप्न पडतात, काही स्वप्न ही चांगली शुभ असतात. परंतु काही स्वप्न ही घाबरवणारी असतात. अशा स्वप्नामुळे आपली चिंता वाढते. आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर दिवसभर त्या स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. असं अनेकांसोबत घडतं.

Vastu Shastra : स्वप्नात सतत साप दिसत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय? काय उपाय करावेत?
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 7:15 PM
Share

माणसाला झोपेत स्वप्न पडतात. काही स्वप्न ही खूप चांगली असतात. तर काही स्वप्न ही वाईट असतात. अशा स्वप्नामुळे आपल्या मनात भीती निर्माण होते. काही विशिष्ट स्वप्न ही शुभ संकेत घेऊ येतात. तर काही स्वप्न अशी देखील असतात, की तुमच्यासोबत काही वाईट घडणार असलेल तर त्याचा पूर्व संकेत ती देत असतात. सर्व साधारणपणे तुम्ही दिवसभर तुमच्या मनात जे चिंतन करत असतात, विचार करत असतात, ही गोष्टी अशीच व्हावी असं तुम्हाला मनापासून व्हावं वाटत असतं, त्याच गोष्टींची स्वप्न तुम्हाला रात्री झोपेत देखील पडतात. परंतु काही स्वप्न ही अशी असतात, जी एखाद्या व्यक्तीला वारंवार पडतात. अशा स्वप्नाकडे दुर्लक्ष करता कामा नये. ही स्वप्न तुम्हाला विशिष्ट संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात.हे संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. आज आपण एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सारखा साप का दिसतो? आणि त्याचा नेमका काय अर्थ असू शकतो? तसेच त्यावर काय उपाय करता येतील? वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

साप स्वप्नात येण्याचा अर्थ काय – जर एखाद्या व्यक्तीला चुकून कधीतरी सापाचं स्वप्न पडलं, स्वप्नात साप दिसला तर ती नॉर्मल गोष्ट आहे. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. परंतु जर एखाद्या व्यक्तीला वांरवार सापाची स्वप्न पडत असतील तर तो एक विशिष्ट संकेत असतो. वारंवार साप स्वप्नात येत असतील तर त्यातून तीन संकेत मिळतात. एक म्हणजे तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या कुलदेवतेचं दर्शन घेतलेलं नाहीये, त्यामुळे देखील तुमच्या सोबत अशा घटना घडू शकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीच्या पूर्वजांनी किंवा त्याने स्वत: नाग मारला असेल तर अशा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो, जर कालसर्पदोष असेल तरी देखील तुम्हाला अशी स्वप्न पडू शकतात. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तरी देखील तुम्हाला अशी स्वप्न पडू शकतात.

काय उपाय करावते? जर तुमच्या स्वप्नात वारंवार साप येत असतील तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं दर्शन घ्या, त्यानंतर कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे, का? यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तसेच पितृदोष असेल तर त्यासाठी दरवर्षी श्राद्ध, पक्ष असे विधी न चुकता करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...