Vastu Tips: मनपसंत नोकरी हवी आहे? मग वास्तुशास्त्रातल्या ‘या’ टिप्स फक्त तुमच्यासाठीच!

| Updated on: Jun 24, 2022 | 9:12 AM

प्रत्येक तरुण आपल्या करिअरसाठी (career) रात्रंदिवस मेहनत करतो. करिअरमध्ये वेगवान होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण फार कमी लोकांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कधी कधी मेहनत, बुद्धिमत्ता आणि  क्षमता असल्यानंतरही यश (success) मिळणे शक्य होत नाही. आजूबाजूचे वातावरण, विचार आणि अनावश्यक अडथळेही यामागे कारणीभूत आहेत. दुसरीकडे, काही लोकांना नोकरी शोधण्यात फारशा अडचणींचा सामना करावा […]

Vastu Tips: मनपसंत नोकरी हवी आहे? मग वास्तुशास्त्रातल्या या टिप्स फक्त तुमच्यासाठीच!
Follow us on

प्रत्येक तरुण आपल्या करिअरसाठी (career) रात्रंदिवस मेहनत करतो. करिअरमध्ये वेगवान होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण फार कमी लोकांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कधी कधी मेहनत, बुद्धिमत्ता आणि  क्षमता असल्यानंतरही यश (success) मिळणे शक्य होत नाही. आजूबाजूचे वातावरण, विचार आणि अनावश्यक अडथळेही यामागे कारणीभूत आहेत. दुसरीकडे, काही लोकांना नोकरी शोधण्यात फारशा अडचणींचा सामना करावा लागत नाही. वास्तविक हे सर्व ग्रहांमुळे घडते. कमकुवत ग्रह जातकांच्या प्रगतीत अडथळा आणतात. मात्र, वास्तुशास्त्रात (Vastu Tips) काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्यांचा अवलंब केल्याने इच्छित नोकरीचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. याशिवाय तुम्ही जर एखाद्या नोकरीमध्ये आधीपासूनच आहात तर त्यात प्रगती होते.

मनपसंत नोकरी मिळविण्यासाठी ‘या’ वास्तु टिप्स

  1. नोकरीच्या मिळण्यास अडथळे येत असल्यास  पिवळा रंग वापरा. पिवळ्या रंगाने  कुंडलीत गुरु ग्रह मजबूत होईल. याचा लवकरच करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल.
  2. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर घराच्या उत्तर दिशेला आरसा लावा. आरसा इतका मोठा असावा ज्यात पूर्ण प्रतिबिंब दिसेल. वास्तुशास्त्रानुसार  असे केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि करियरसाठी नव्या वाटा निर्माण होतात.
  3. मुलाखतीला जाताना लाल किंवा हिरवे कपडे घाला. जर ते शक्य नसेल तर तुम्ही या रंगाचा रुमाल सुद्धा सोबत ठेवू शकता. असे केल्याने यश मिळण्याची शक्यता वाढेल.
  4. घरातून बाहेर पडण्यापूर्वी गणेशाची पूजा करा. गणेशाच्या मूर्तीला दुर्वा आणि शेंदूर वाहा. हा उपाय खूप प्रभावी आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6.  ज्या लोकांना त्यांच्या जन्मपत्रिकेतील ग्रह दोषांमुळे त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येत आहेत. त्यांनी एक मुखी, दहा मुखी किंवा अकरा मुखी रुद्राक्ष धारण करावा. असे केल्याने करिअरमधील सर्व अडथळे दूर होतील.
  7. लेखन, संशोधन किंवा कला क्षेत्रात काम करणाऱ्यांचे काम करण्याचे स्थान असे असावे की, त्याच्या मागे एक भिंत असावी. यामुळे कामात चांगले परिणाम मिळतात.
  8. वास्तुशास्त्रानुसार बसण्याची जागा प्रवेशद्वारापासून दूर असावी. यामुळे वास्तुदोषांपासून बचाव होतो.
  9. मुख्य दरवाजाकडे पाठकरून  बसण्याची चूक कधीही करू नका. असे केल्याने तुमच्या जीवनात नकारात्मकता येईल.
  10. जर तुम्ही घरून काम करत असाल तर कधीही बेडरूममध्ये बसून काम करू नका. असे केल्याने प्रगतीला बाधा येते.
  11. ऑफिसमधले टेबल लाकडाचे असेल तर ते चांगले आहे. प्लॅस्टिकच्या टेबलवर काम करणे टाळा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)