
दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असतो, या सणाला दीपोत्सव असं देखील म्हटलं जातं. दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. या दिवशी घरात सर्वत्र दिवे लावले जातात, घर दिव्यांनी उजळून निघतं, माता लक्ष्मी, गणेश आणि धनाचे देवता कुबेर यांची या दिवशी पूजा केली जाते. दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्यानं दिवाळीची तयारी काही आठवडे आधीच सुरू होते, या काळात सर्व घराची साफ-सफाई केली जाते, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय आहेत, जे दिवाळीच्या दिवशी केल्यास घरात सुख, समुद्धी येते, पैशांचा कधीही तुटवडा जाणवत नाही. आज आपण अशाच काही उपायांबाबत जाणून घेणार आहेत.
दिवाळीच्या दिवशी काही खास गोष्टी या तिजोरीत ठेवा, एक रुपयाच्या नाण्यासोबत सुपारी आणि गुलाबाच्या काही पाकळ्या एका कपड्यात बांधा, शक्यतो हा कपडा लाल पाहिजे, त्यामध्ये एक रुपयाच्या नाण्यासोबत सुपारी आणि गुलाबाच्या काही पाकळ्या बांधा, हे सर्व साहित्य आधी माता लक्ष्मीच्या फोटो जवळ ठेवा, त्याची पूजा करा, त्यानंतर या सर्व गोष्टी तुमच्या पैशांच्या तिजोरीत ठेवा, सोबतच जर तुम्ही तुमच्या कपाटात चांदीचा शिक्का जर ठेवला, तर लक्ष्मी मातेची कृपा सदैव तु्मच्यावर राहते.
तुमच्यावर कर्ज झालं आहे, खूप प्रयत्न करून देखील कर्ज कमी होत नाहीये, तर यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता, दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरातील तिजोरीत नोटांचं एक बंड ठेवा, या नोटांच्या बंडलामध्ये दहाच्या नोटेपासून 500 च्या नोटेपर्यंत कोणत्याही नोटा असतील तरी चालतील.दिवाळीच्या दिवशी हा उपाय केल्यास हळू हळू तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते, तुमचं कर्ज फिटतं. सोबतच माता लक्ष्मीला कवडी देखील अर्पण केली जाते, पूजा झाल्यानंतर ही कवडी एका लाल रंगाच्या कापडात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)