माहेरातून कधीच घेऊन येऊ नका या 5 वस्तू, सासू करेल रोज भांडण, आईसोबतही निर्माण होईल दुरावा

माहेरची पिशवी भरताना आईकडून प्रेमाने अनेक वस्तू दिल्या जातात. पण काही पारंपरिक मान्यतांनुसार विशिष्ट वस्तूंना नात्यातील दुरावा किंवा तणावाशी जोडले जाते. नेमक्या कोणत्या वस्तू आहेत, जाणून घ्या.

माहेरातून कधीच घेऊन येऊ नका या 5 वस्तू, सासू करेल रोज भांडण, आईसोबतही निर्माण होईल दुरावा
mother daughter fight
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 7:09 PM

मुलगी माहेरी आली की आईची एकच लगबग सुरू होते. मग लोणचं, डब्ब्यात लाडू, छोट्या मोठ्या संसाराच्या वस्तू हे सगळं आई देते. याशिवाय ऐनवेळी दारातून बाहेर पडताना आणखी दोन पिशव्या हातात येतातच. पण वास्तूशास्त्रातील काही मान्यतांनुसार मुलीला माहेराहून काही गोष्टी देण अशुभ मानलं जातं. काही वस्तू दिल्याने आई आणि मुलीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. त्यामुळे या ५ गोष्टिंचा विचार नक्की करा.

चाकू – कात्री गिफ्ट? यामुळे नात्यात दुरावा येतो

मुलीला चाकू, कात्री किंवा इतर धारदार वस्तू भेट देऊ नयेत, अशी वास्तूशी संबंधित मान्यता आहे. धारदाक वस्तू नातं कापण्याच प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे प्रेमाने दिलेले गिफ्ट भांडणाच कारण ठरू शकते.

गॅस किंवा शेगडी

आगीचा संबंध उष्णता आणि तणावाचा असतो. त्यामुळे आईने मुलीला गॅस किंवा शेगडी देऊ नये असे वास्तूशास्त्रात नमूद केलेले आहे. त्यामुळे ज्या वस्तू शांततेच प्रतिक असतील अशा वस्तू दिल्या जाव्या.

आंबट लोणचं

मुलगी माहेरी आली कि मुलीला हमखास लोणच्याची बरणी दिली जाते. पण वास्तूशास्त्रानुसार लोणच्याचा आंबटपणा नात्यांमध्ये उतरतो आणि भांडण होतात.

कॅकटस

आजकाल घर सजवण्यासाठी कॅक्टस आणि इतर काटेरी रोप गिफ्ट म्हणून दिली जातात. मात्र वास्तूशास्त्रानुसार मुलीला असे काटेरी रोप देण टाळावं. कारण काटे हे तणाव अडचणी आणि नात्यांमधील कडवटपणाचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे प्लांट द्यायचंच असेल तर सजावटीचे रोप किंवा फुलझाड देणे चांगले.

काळे कपडे

काळ रंग आजच्या फॅशनमध्ये कितीही लोकप्रिय असला तरी काही पारंपरिक आणि वास्तू मान्यतांमध्ये शुभ प्रसंगी काळ्या रंगाचा वापर टाळला जातो. कारण काळा रंग नकारात्मकता आणि वाईट शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मुलीला असा रंग देऊ नये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us