AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra: मिठाचं दान केव्हा आणि कोणाला करावं? जाणून घ्या नियम, होतात तीन जबरदस्त फायदे

हिंदू धर्मशास्त्रामध्ये मिठाला लक्ष्मीचं रूप माण्यात येतं. त्यामुळे मीठ दान करण्याचे देखील काही नियम आहेत, ज्याबद्दल वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी मीठ कधीच दान करू नये, त्यामुळे घरात गरिबी येते. आज आपण मीठ कोणाला आणि कधी दान करावं? याबद्दल नियम जाणून घेणार आहोत.

Vastushastra: मिठाचं दान केव्हा आणि कोणाला करावं? जाणून घ्या नियम, होतात तीन जबरदस्त फायदे
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 03, 2026 | 9:28 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रानुसार मीठ हे लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं. त्यामुळे मिठाचा संबंध थेट तुमच्या आर्थिक प्रगतीशी जोडला जातो. असंही म्हटलं जातं की घरातील मीठ कधीही संपू देऊ नये. घरात कायम मीठ शिल्लक असावं. अनेकांना मिठासंबंधित काही नियम माहिती नसतात, त्यामुळे असे लोक अनेकदा अशा काही चुका करतात, ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. आज आपण मीठ दान करण्याचे काय नियम आहेत? कोणत्या दिवशी मीठ दान करावं? कधी मीठ दान करू नये? मीठ कोणाला आणि कुठे दान करावं? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार मीठ कधीही सायंकाळच्यावेळी दान करू नये, त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कधीही मीठ सायंकाळच्यावेळी दान करू नये, अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

मीठ कधी दान करावं? वास्तुशास्त्रानुसार मीठ हे नेहमी शनिवारी दान करावं, शनिवारी दान केलेलं मीठ हे अत्यंत शुभ माण्यात येतं. यामुळे जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीदोष असेल तर तो दूर होतो आणि शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात. तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी हळुहळु दूर होतात. त्यामुळे शनिवारी मीठ दान करणं हे अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. तसेच शनी महाराजांशी संबंधित दिवशी देखील तुम्ही मिठाचं दान करू शकता. जसं की शनी जयंती, अमवस्या अशा दिवशी मिठाचं दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

मीठ कोणाला दान करावं? वास्तुशास्त्रानुसार शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तींना मीठ दान करावं. यामुळे शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात, तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. तसेच तुम्ही एखाद्या मंदिरात देखील मीठ दान करू शकता. जिथे भंडारा आहे, अशा ठिकाणी तुम्ही जर मीठ दान केलं तर तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य आणि स्थिरता प्राप्त होतं. तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमी राहत नाही.

मीठ दान करण्याचे फायदे – जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनीदोष असेल आणि अशा व्यक्तीने जर मीठ दान केलं तर त्याच्या कुंडलीमधील शनीदोष दूर होतो. एवढंच नाही तर घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती दूर होऊन, सकारात्मक ऊर्जा तयार होते. शनी देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!