तुळ राशीत शुक्राचं संक्रमण, या 4 राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक, दुसरी रास ठरणार सर्वात खास

ग्रहांचं संक्रमण झाल्यानंतर त्याचे चांगले वाईट परिणार आपल्या राशींवर होताना दिसतात. याचे परिणाम चांगले किंवा वाईट देखील असू शकतात. तर आता तुळ राशीत शुक्राचं संक्रमण होणार आहे. तर या संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घ्या.

तुळ राशीत शुक्राचं संक्रमण, या 4 राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक, दुसरी रास ठरणार सर्वात खास
| Updated on: Aug 29, 2026 | 1:37 PM

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीचं खास महत्त्व सांगितलं आहे आणि यामध्ये राशींना फार मोठं महत्त्व आहे… अशात ग्रहांचं संक्रमण झाल्यानंतर त्याचा 12 राशींवर फार मोठा परिणाम होतो. आता देखील तुळ राशीत शुक्राचं संक्रमण होत आहे. सांगायचं झालं चर, नऊ ग्रहांपैकी, शुक्र हा प्रेम, नातेसंबंध, रूप आणि संपत्तीवर प्रभाव टाकणारा ग्रह मानला जातो, म्हणूनच शुक्राच्या भ्रमणाला ज्योतिषीय फलित म्हणून खूप महत्त्वाचं मानलं जातं. सध्या दुर्बळ अवस्थेत असलेला शुक्र, सप्टेंबर महिन्यात स्वराशीत प्रवेश करणार आहे. शुक्र बुधवार, 2 सप्टेंबर रोजी दुपारी 1.41 वाजता तूळ राशीत प्रवेश करेल. यामुळे प्रामुख्याने काही राशींना यश आणि शुभ परिणाम मिळतील. तर कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या…

मेष : ज्याोतिषशास्त्रानुसार, शुक्र मेष राशीच्या सातव्या घरात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे मेष राशीच्या लोकांना अनेक चांगले लाभ मिळतील. 2 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या काळात या राशीच्या लोकांना अनेक लाभ मिळतील. आर्थिक लाभ, आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. वैयक्तिक जीवनाबाबत सांगायचं झाल्यास, कुटुंबात शांतता नांदेल. आत्मविश्वास वाढेल. विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी हे उपयुक्त ठरेल.

मिथुन : या गोचरादरम्यान, शुक्र मिथुन राशीच्या पंचम स्थानात प्रवेश करेल. शुक्राचा पंचम स्थानातील प्रवेश सर्वसाधारणपणे सर्वांसाठी शुभ लाभ घेऊन येतो. जीवनातील अनेक समस्यांचं निराकरण होईल. व्यावसायिकांना लाभ होईल. ज्यांना कामासाठी परदेशात जायचे आहे, त्यांना फायदेशीर संधी मिळतील. व्यवसायाच्या विकासासाठी हा अनुकूल काळ आहे. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. संततीसंबंधी काही चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे.

तूळ : शुक्र तूळ राशीच्या तिसऱ्या घरात प्रवेश करत आहे. स्वराशीत शुक्राचा प्रवेश त्यांना दुहेरी लाभ देईल, विशेषतः 3 ऑक्टोबरपर्यंत. भाग्य त्यांना पूर्णपणे साथ देईल. मनात बऱ्याच काळापासून असलेल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना शांती आणि आनंद मिळेल. तुम्हाला समाजात अधिक आदर मिळेल. तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील.

धनु : शुक्राचं तूळ राशीतील संक्रमण धनु राशीसाठी अनेक लाभ घेऊन येईल. या काळात शुक्र धनु राशीच्या शुभ सहाव्या घरात प्रवेश करेल. या काळात तुमचा खर्च कमी होईल आणि विविध स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांना त्यांच्या त्रासातून दिलासा मिळेल. तुमच्या कार्यालयीन मेहनतीला फळ मिळेल. पगारवाढ होण्याचीही शक्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us